RETHINKING TOURISM -2
तुम्हाला आठवत असेल कि लहानपणी आपण दिवाळीला हमखास आपल्या गावी अथवा मामाच्या गावी जात होतो. आता दिवाळीची सुट्टी आली कि आपण मोठी ट्रिप आखतो. हा फरक झाला आहे आता. पण जसे आपण मागच्या लेखा मध्ये पाहिले की नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना भेटणे हा आपल्या भारतीय लोकांचा खास पर्यटनाचा हेतू असायचा याचेच आधुनिक रूप म्हणजे cultural exchange program . दिवाळी हा तर सणांचा राजा या वेळी आपण विविध फराळाचे पदार्थ , आकाशदिवे आणि इतर बऱ्याच सजावटीच्या गोष्टी बनवत असतो. आणि माझ्या माहिती नुसार आपले चकली, चिवडा, अनारसे असे फराळाचे पदार्थ इतर राज्यातील आपले ओळखीचे लोकं अत्यंत आवडीने खातात आणि आवर्जून आपल्याला आणण्यास सांगतात. यातीलच कोणी आपली संस्कृती यामध्ये खाद्य संस्कृती , पोशाख , विविध सणाला अनुरूप सजावट , सणाचे धार्मिक ऐतिहासिक आणि आपल्या हवामानानुसार आरोग्याचे महत्व हे सगळे मुद्दे इतर संस्कृतीतून आल्याला लोकांस जाणून घेण्याची इच्छा असते. त्यासाठी आपल्याला या सणाची योग्य माहिती असली पाहिजे म्हणजे हे सर्व आपण सांगू शकू. तुम्हाला वाटेल यांच्यात काय एवढे विशेष पण जे लोकं event ...