Posts

Showing posts with the label Tourism Marathi

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव | RETHINKING TOURISM | treasuretale.blogspot.com

Image
 सुमंगलम  पंचमहाभूत लोकोत्सव  ... कणेरी मठ ,कोल्हापूर  आपण पर्यटनाचे विविध प्रकार बघताना पहिले होते की फक्त एखाद्या ठिकाणी जाऊन येणे एवढेच करण्यापेक्षा भेट दिलेले ठिकाण अनुभवणे महत्वाचे ज्याचा उपयोग आपल्याला नंतर झाला पाहिजे. तर असाच अनुभव मिळण्याकरिता कणेरी मठ, कोल्हापूर येथे २०-२६ फेब्रुवारी २०२३ आयोजित केलेला पंचमहाभूत लोकोत्सव मस्ट व्हिजिट असा आहे.  दैनंदिन आयुष्यात पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, वायू, आकाश , तेज हे आपल्याला माहिती असते पण याची निर्मिती कशी होते , याचे महत्व काय आणि आपल्या जीवनावर यांचा कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी इथे मॉडेल तयार केली आहेत जेणेकरून हि सर्व माहिती सहज रित्या आपल्याला कळू शकेल.  सद्य स्थितीत आपण पर्यावरण विषयी खूप सजग झालो आहोत तर जो पर्यंत याची नीट माहिती आपण घेत नाही तोवर संवर्धन म्हणजे नेमके काय करायची अगदी आपल्या नेहमीच्या सवयी जरी बदलल्या तरी किती मोठे काम यातून होऊ शकते याची उदाहरणे या ठिकाणी पाहायला मिळतील. खरं तर हि माहित असतील पण तितके महत्व लक्षात न आल्याने आपण निष्काळजीपणे वापरतो तर थोडी जागरूकता निर्माण होईल आणि सुयोग्य बदल घडून आला

RETHINKING TOURISM -6 | PILGRIMAGE TOURISM

Image
 आपण डेस्टिनेशन चे दोन प्रकार पहिले आता आपण tourism चे प्रकार बघू . आपल्या सर्वात परिचयाचा आणि नेहमीचा म्हणजे pilgrimage tourism . आपल्या आवडत्या धार्मिक स्थळांना जाऊन तेथील वातावरण अनुभवून मनःशांती मिळवण्याचा आपला हेतू असतो. साधारण पणे आपण गर्दी टाळून दर्शन होईल अशा प्रकारे प्लॅन करतो. मात्र काही काही उत्सव यात्रा अशा असतात की ज्यासाठी आपल्याला त्या गर्दीचा भाग होता आले तर नेमके कशासाठी हे चालू आहे याची अनुभूती मिळू शकते.  अशी कल्पना करा कि आपण एक थ्री डी गेम पाहत आहोत आणि त्यानुसार आता visualise करा की आपण एकदा तिथे पोहोचल्यावर कशा पद्धतीने तो सभोवताल न्याहाळतो. मग आपले चप्पल काढण्यापासून ते काही पूजेचे साहित्य खरेदी , मग रांगेत उभे राहून आपला दर्शनाचा नंबर येई पर्यंत वाट बघणे या दरम्यान आपण आपले विचार पाहायचे शांतपणे.  आणि मग ज्यासाठी एवढा अट्टहास केला त्याक्षणी म्हणजेच दर्शनाच्या वेळी आपले लक्ष विचलित न होता , दर्शनमात्रें कामनापूर्ती असा अनुभव सहज मिळेल. मग आपल्या सर्वांचा आवडता प्रसाद घेऊन आपण निघतो. या प्रसादाचे स्थानमाहात्म्य असतेच त्यामुळे घरी केलेला शिरा आणि मंदिरातील प्रसाद