RETHINKING TOURISM -6 | PILGRIMAGE TOURISM
आपण डेस्टिनेशन चे दोन प्रकार पहिले आता आपण tourism चे प्रकार बघू .
आपल्या सर्वात परिचयाचा आणि नेहमीचा म्हणजे pilgrimage tourism . आपल्या आवडत्या धार्मिक स्थळांना जाऊन तेथील वातावरण अनुभवून मनःशांती मिळवण्याचा आपला हेतू असतो. साधारण पणे आपण गर्दी टाळून दर्शन होईल अशा प्रकारे प्लॅन करतो. मात्र काही काही उत्सव यात्रा अशा असतात की ज्यासाठी आपल्याला त्या गर्दीचा भाग होता आले तर नेमके कशासाठी हे चालू आहे याची अनुभूती मिळू शकते.
अशी कल्पना करा कि आपण एक थ्री डी गेम पाहत आहोत आणि त्यानुसार आता visualise करा की आपण एकदा तिथे पोहोचल्यावर कशा पद्धतीने तो सभोवताल न्याहाळतो. मग आपले चप्पल काढण्यापासून ते काही पूजेचे साहित्य खरेदी , मग रांगेत उभे राहून आपला दर्शनाचा नंबर येई पर्यंत वाट बघणे या दरम्यान आपण आपले विचार पाहायचे शांतपणे.
आणि मग ज्यासाठी एवढा अट्टहास केला त्याक्षणी म्हणजेच दर्शनाच्या वेळी आपले लक्ष विचलित न होता , दर्शनमात्रें कामनापूर्ती असा अनुभव सहज मिळेल. मग आपल्या सर्वांचा आवडता प्रसाद घेऊन आपण निघतो. या प्रसादाचे स्थानमाहात्म्य असतेच त्यामुळे घरी केलेला शिरा आणि मंदिरातील प्रसाद म्हणून मिळणार शिरा यात खूप फरक असतो. हा तर स्वतंत्र विषय आहे फूड या वर परत कधी तरी लिहू जर हे आवडत असेल तर.
हे मंदिरे यातील शिल्प, वास्तुरचना , मूर्तींचे प्रकार , त्यावरील दागिने , वस्र प्रावरणे हे आपल्याला खूप काही माहिती सांगतात ती अवश्य बघावी. बऱ्याचदा निसर्गरम्य ठिकाणी ही pilgrimage places असतात जी आपल्याला भव्य दिव्य आणि निर्भय व्हायला शिकवतात.
या तऱ्हेने हे दर्शन फलश्रुति आपसूकच न-मन

Comments
Post a Comment