world heritage day
जागतिक वारसा दिन
खरे तर हा दिवस उत्तम ऐतिहासिक वास्तूंचा म्हणून ओळखला जातो पण खरंच वारसा म्हणजे नक्की काय?
एखाद्या वास्तू पुरता मर्यादित असतो का ?
नाही ना !
तर आपली आधीची ओळख जी आपण जपण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे वारसा नाहीतर आपण सध्याच्या मॉडर्न जगात जेव्हा आपल्याला अस्सल , ठळक गोष्ट हवी असते मग आपण धुंडाळतो तो म्हणजे वारसा मग ते पदार्थ , कपडे , भाषा , व्यवहार , संस्कार अशा सर्व गोष्टी ज्या कळत नकळत पणे आपल्या पर्यंत येतात आणि ह्या साऱ्या गोष्टींचे साक्षीदार ह्या वास्तू असतात .
आपण एखादी वास्तू जेव्हा पाहतो त्या बरोबर त्याचे भौगोलिक , राजकीय, सामाजिक , आर्थिक इ महत्व सांगू पाहतो . अशा पद्धतीने जेव्हा आपण ते पाहतो तेव्हा त्यातील बारकावे लक्षात येतात उदा एखादा किल्ला हा इथेच का बांधला हे जेव्हा वरील गोष्टींचा आपण विचार केला तर त्या विषयीचे सखोल माहिती सहज मिळू शकते नाहीतर फोटो तर ढीग काढले पण आहे काय काय माहीत असा प्रकार ? तुम्हाला एवढं माहित करून उपयोग काय , अहो नाहीतर research काय असतो जे आधी केले त्यातच सुसंगत आधुनिक बदल घडवणे .
या साठी हेरिटेज ठिकाणीच गेले पाहिजे असे काही नाही आपल्या गावातील मंदिरे , मैदाने , नद्या , डोंगर अशा कित्येक गोष्टी आपण जर डोळस पणे पाहिल्यास त्या त्या भागातील वारसा कळून येतो .
आणि आपले वडिलोपार्जित घर हे सुद्धा आपली ओळख सांगत असते त्या कडे लक्ष देणे हे मात्र आपले काम नाहीतर याचा काय उपयोग ? असे वाटत असेल तर काही खरे नाही .
या वास्तू जपण्याचे शास्त्र आहे नाहीतर मारा ऑइल पेंट काळ्या दगडावर असले विचित्र प्रयोग अडाणीपणातून आपण करतो
असो तर आपण आपल्या गोष्टींचे ज्ञानवंत जपणूक करून खरे वारसदार होऊ म्हणजे अभिमानाने म्हणू शकू - आम्ही चालवू हा पुढे वारसा !

Comments
Post a Comment