7 INTERESTING FACTS OF THE TAJ MAHAL PALACE HOTEL | MARATHI
आपल्याला फाईव्ह स्टार हॉटेल बद्दल कायमच कुतूहल असते तर आज आपण भारतातील पहिले luxury हॉटेलची माहिती बघूयात . तुम्हाला नक्कीच कळले असेल कि कोणत्या हॉटेल बद्दल मी बोलत आहे ते दूरदृष्टी असणारे प्रख्यात उद्योजक सर जमशेटजी टाटा यांनी यांनी सन १८९८ मध्ये भूमिपूजन केलेले आणि १६ डिसेंबर १९०३ साली १७ गेस्ट पासून भारतीय हॉटेल उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. ताज महल पॅलेस हे पहिले भारतीय आलिशान सर्व सुखसोयींनी युक्त ( luxury ) पंचतारांकित हॉटेल निर्माण केले. रावसाहेब वैद्य आणि D N Mirza या भारतीय वास्तुविशारदांनी याचे design आणि सोराबजी कॉन्ट्रॅक्टर यांनी बांधकाम केले. या नंतर गेट वे ऑफ इंडिया १९११ साली पायाभरणी झाली. आपल्याला ठळकपणे दिसणारा लाल रंगाचा डोम हा वास्तुकलेचा विशेष नमुना आहे. हा २४० फुटाचा डोम आजही इंडियन नेव्ही साठी दिवसाच्या वेळेच्या अंदाजासाठी कामी येतो. लाईट असणारे हे पहिले भारतीय हॉटेल असून त्यासोबत अमेरिकन फॅन , जर्मन लिफ्ट, मुंबईतील पहिला परवाना असलेला बार ,नाईट क्लब , दिवसभर चालू असणारे रेस्टॉरंट शामियाना , जापन...