NEW YEAR |नेमेची येतो
सालाबादप्रमाणे यंदाही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे आणि जुने कॅलेंडर मध्ये झालेला संवाद न. कॅ. - जुने जाऊद्या मरणालागुनी .... जु कॅ - बरं बाबा ये माझ्या जागी न. कॅ - अब वक्त भी हमारा है , भिंत भी हमारी , खिळा भी हमारा जु कॅ - एवढ्या काही फुशारक्या मारू नको, एक वर्षपूर्वी मीही असाच शेफारून गेलो होतो . तुझे असं होऊ देऊ नको न. कॅ- हा हे मात्र खरे आहे जु कॅ- आता कसं ! आपली फक्त जागा बदलते , पंत गेले राव आले त्यासारखे न. कॅ - असं कसं ? नवीन वर्ष म्हणजे किती तरी नवीन संधी म्हणून तर एवढ्या जोरात स्वागत करतात की आपले जु कॅ- हा पण आपण फक्त तारखा दाखवतो त्यासंस्मरणीय करणे थोडेच आपल्या हातात आहे न. कॅ - छ्या मला नाही पटत . आता ज्याने मला इथे आणले त्याने बघ किती नव वर्षाचे संकल्प केलेत ते जु कॅ- हा हा हा दिखावे पे मत जाओ न. कॅ- म्हणजे ! जु कॅ- याच्यातले बरेच माझ्या वेळचेच आहेत हे बघ माझ्यावर लिहून ठेवलेल्या नोंदी न. कॅ - हा खरंय रे जु कॅ - म्हणून तर म्हण...