PLAN YOR EVENT LIKE PRO | IN MARATHI
मागील ब्लॉगमध्ये भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल ची माहिती पाहिली. इथे खूप सारे मेनूचे पर्याय आपल्याला मिळतात तर असेच विविध पर्याय तयार करताना कोणते मुद्दे हॉटेल्स पाहतात ते बघू जे आपण आपल्या कार्यक्रमांकरिता सुद्धा वापरू शकतो. १. कार्यक्रमाचे स्वरूप - कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आहे म्हणजे फॉर्मल किंवा इन्फॉर्मल हे बघावे. इन्फॉर्मल मध्ये आपले फ्रेण्ड्स - फॅमिली सोबतचे कार्यक्रम उदा. लग्न, रिसेप्टशन , वाढदिवस ज्या मध्ये विशिष्ट नियम पाहुण्यांकरता नसतात याचा समावेश होतो तर फॉर्मल मध्ये ऑफिस , मीटिंग या ठिकाणचे व्यवसाय संबंधित कार्यक्रम असतात ज्यात ड्रेस कोड आणि विशिष्ट प्रोटोकोल पाळावे लागतात. २. कार्यक्रमाची वेळ - किती वाजता कार्यक्रम आयोजित केला आहे ते पाहावे . उदा. ब्रेकफास्ट ,ब्रंच , लंच , इव्हनिंग टी , डिनर त्यानुसार आपण कोणत्या डिशेस मेनू मध्ये समाविष्ट करायच्या ते निवडण्यास मदत होईल. ३. सीझन - वरील दोन्ही मुद्यांना जोडून उन्हाळा,पावसाळा, हिवाळा अथवा आताच्या नुसार कॉम्बिनेशन असेल तर त्यानुसार पदार्थ निवडले तर असे पदार्थ कार्यक्रमाची लज्जत...