PLAN YOR EVENT LIKE PRO | IN MARATHI


 मागील  ब्लॉगमध्ये भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल ची माहिती पाहिली.  इथे खूप सारे मेनूचे पर्याय आपल्याला मिळतात  तर असेच विविध पर्याय तयार करताना कोणते मुद्दे हॉटेल्स पाहतात ते बघू जे आपण आपल्या कार्यक्रमांकरिता सुद्धा वापरू शकतो. 

१. कार्यक्रमाचे स्वरूप - कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आहे म्हणजे फॉर्मल किंवा इन्फॉर्मल हे बघावे. इन्फॉर्मल मध्ये आपले फ्रेण्ड्स - फॅमिली सोबतचे कार्यक्रम उदा. लग्न, रिसेप्टशन , वाढदिवस ज्या मध्ये विशिष्ट नियम पाहुण्यांकरता नसतात याचा समावेश होतो तर फॉर्मल मध्ये ऑफिस , मीटिंग या ठिकाणचे व्यवसाय संबंधित कार्यक्रम असतात ज्यात ड्रेस कोड आणि विशिष्ट प्रोटोकोल पाळावे लागतात. 

२. कार्यक्रमाची वेळ - किती वाजता कार्यक्रम आयोजित केला आहे ते पाहावे . उदा. ब्रेकफास्ट ,ब्रंच , लंच , इव्हनिंग टी , डिनर त्यानुसार आपण कोणत्या डिशेस मेनू मध्ये समाविष्ट करायच्या ते निवडण्यास मदत होईल. 

३. सीझन - वरील दोन्ही मुद्यांना जोडून उन्हाळा,पावसाळा, हिवाळा अथवा आताच्या नुसार कॉम्बिनेशन असेल तर त्यानुसार पदार्थ निवडले तर असे पदार्थ कार्यक्रमाची लज्जत जास्त वाढवतील. आता तुमच्या जिभेवर नक्की काही पदार्थ रेंगाळले असतील जे त्या त्या सिझन मध्ये मस्ट खावेसे असतील. 

४. थीम - हल्ली बरेचसे कार्यक्रम एखाद्या थीम वर आधारित असतात विशेषतः लग्नें , वाढदिवस तर त्या साठीचे नेमके नियोजन करणे आवश्यक ठरते. इथे जर विसंगती झाली तर संपूर्ण कार्यक्रमाचा फज्जा होऊ शकतो. समजा एखाद्या सण, उत्सव, या दिवशी जर कार्यक्रम ठरवलं असेल तर त्या दिवसाचे महत्व कार्यक्रमाचे नियोजन करताना लक्षात ठेवावे लागते. 

५. सहभागी व्यक्ती - अंदाजे किती लोकं असणार आहेत , त्यांचे वयोमान, सर्व साधारण पणे त्यांची आवड कारण आपण उत्साहाने एखादी नवीन डिश प्लॅन करणार आणि नेमकी तीच शिल्लक राहणार. जर परदेशी व्यक्ती कार्यक्रमाला येणार असतील तर त्यांच्या खाण्याच्या पद्धतीनुसार पदार्थांचा समावेश करावा .  तसेच कोणत्या प्रकारे फूड सर्व करायचे त्यासाठी सुद्धा हि माहिती उपयुक्त ठरते. 

एक लक्षात घ्या कि केवळ उदरभरण नसून आता हे कमाल, बहार, मजा आगया अशी प्रतिक्रिया हवी असल्यास वरील मुद्द्यांचा नक्की वापर करून पहा आणि आलेल्या व्यक्ती नावं न ठेवता नाव घेतील असे होईल . 

Comments

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day