8 TIPS FOR PERFECT TRIP PLANNING | ITINERARY PLANNING IN MARATHI
सुट्ट्यांचा हंगाम चालू होतोय आणि नववर्ष स्वागतासह सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी चांगले डेस्टिनेशन तुम्ही शोधून ठेवले असतीलच तर याच्याजोडीला परफेक्ट प्लॅन करता आला तर हि ट्रिप memorable होईल तर बघू यासाठी काय काय माहिती असणे आवश्यक आहे ते वेळ - आपल्याकडे असलेला वेळ किती आहे त्यानुसार शोधलेल्या डेस्टिनेशन च्या आजूबाजूचे कुठले पॉईंट्स बघायचे आणि नाही ते आपण ठरवू शकतो. बरयाचदा खूप जास्त पॉईंट्स कव्हर करण्याच्या नादात , ज्या साठी म्हणून ट्रिप प्लॅन केली जाते ते भर्र्कन क्षण निघून जातात. शक्यतो एखादा दिवस राखीव ठेवता येईल या हिशोबाने प्लॅनिंग करावे म्हणजे दगदग झाल्यासारखे वाटणार नाही. बजेट - या ट्रिप साठी किती पैसे खर्च करायचे हे निश्चित करा म्हणजे ट्रिप इकॉनॉमिकल होईल. ऑनलाईन पेमेंट, चेक्स, आणि कॅश हे जवळ ठेवा. जेवढे सुयोग्य नियोजन असेल तेवढा खर्चाचा ताळमेळ घालणे सोपे व्यक्ती - किती जणं जाणार आहेत त्यामध्ये आपण लहान मुले, घरातील वडीलधारे आणि स्री - पुरुष यानुसार एखाद्या ठिकाणी जाण्याची आणि पोहोचण्याची वेळ ठरवता येईल. हि माहिती किती स्पॉट कव्हर कर...