TREKKING | ADVENTURE TOURISM IN MARATHI | RETHINKING TOURISM -11
आपण प्रवासाचे नियोजन कसे करायचे ते पाहिले आहेच आता एक असा प्रकार पाहू जो पाहिला कि थरारक अनुभव आपणांस जाणवतो पण यातील ऍक्टिव्हिटी करताना कदाचित भीती सुद्धा वाटू शकते. साहसी पर्यटन हा एक असाच वेगळा प्रकार आहे जे खूप थोडे पर्यटक याच्या वाट्याला जातात. लहानपणी आपण खूप साहसी असतो पण जसजसे मोठे होते तसे एखाद्या गोष्टीतील धोके लक्षात येऊ लागल्यावर आपला उत्साह मावळत जातो. पण थोडी व्यायामाची सवय आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हा प्रकार खूप विविध प्रकारचे अनुभव आपल्याला मिळवून देतो आणि नवीन साहस करण्यास प्रेरीतही करू शकतो. तसे पहिले गेल्यास या साहसी पर्यटनाचे आकाश,पाणी आणि जमिनीवरचे अशा उप-प्रकारात वर्गीकरण करता येईल. सुरुवातीला आपण जमिनीशी निगडीत प्रकार पाहू ट्रेक - हा सर्वांना हवा हवासा आणि IN प्रकार म्हणता येईल असा आहे. यात आपण चालत ठरलेल्या\ठिकाणी पोहोचतो ज्यात आपले सामान पाठीवरच्या बॅगेत आपल्याला न्यावे लागते. काही ट्रेक सोपे , मध्यम आणि अवघड अशा प्रकारात येतात. या मध्ये आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो त्यामुळे नियमित ज्यांचे चालणे आहे ...