TREKKING | ADVENTURE TOURISM IN MARATHI | RETHINKING TOURISM -11
आपण प्रवासाचे नियोजन कसे करायचे ते पाहिले आहेच आता एक असा प्रकार पाहू जो पाहिला कि थरारक अनुभव आपणांस जाणवतो पण यातील ऍक्टिव्हिटी करताना कदाचित भीती सुद्धा वाटू शकते. साहसी पर्यटन हा एक असाच वेगळा प्रकार आहे जे खूप थोडे पर्यटक याच्या वाट्याला जातात.
लहानपणी आपण खूप साहसी असतो पण जसजसे मोठे होते तसे एखाद्या गोष्टीतील धोके लक्षात येऊ लागल्यावर आपला उत्साह मावळत जातो. पण थोडी व्यायामाची सवय आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हा प्रकार खूप विविध प्रकारचे अनुभव आपल्याला मिळवून देतो आणि नवीन साहस करण्यास प्रेरीतही करू शकतो.
तसे पहिले गेल्यास या साहसी पर्यटनाचे आकाश,पाणी आणि जमिनीवरचे अशा उप-प्रकारात वर्गीकरण करता येईल. सुरुवातीला आपण जमिनीशी निगडीत प्रकार पाहू
ट्रेक - हा सर्वांना हवा हवासा आणि IN प्रकार म्हणता येईल असा आहे. यात आपण चालत ठरलेल्या\ठिकाणी पोहोचतो ज्यात आपले सामान पाठीवरच्या बॅगेत आपल्याला न्यावे लागते. काही ट्रेक सोपे , मध्यम आणि अवघड अशा प्रकारात येतात. या मध्ये आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो त्यामुळे नियमित ज्यांचे चालणे आहे ते हे करू शकतील. तसेच हा प्रकार आडवाटेचा असल्याने नेहमीसारखे खाणे - पिणे , राहण्याची सोयी यात तडजोड करायची तयारी असेल तर खरं अनएक्सप्लोर्ड जागा पाहू शकतो.
अद्भुत रम्य सृष्टीचे नजारे आपल्याला पाहायला मिळतात. रात्रीच्या वेळेचे आकाश दर्शन हे तर शहरात शक्य होत नाही इथे मात्र प्रदूषणविरहित ठिकाणे असल्याने स्पष्ट आकाश पाहू शकतो.
मागे या काही ब्लॉग मध्ये आपण बघितले आहे जर आपल्याला थोडी बहुत माहिती असेल तर जे काही आपण पाहात आहोत ते अनुभवू देखील चांगल्या प्रकारे शकतो.
या ट्रेक मध्ये आता सोलो ट्रॅव्हलर नावाचा नवीन प्रकार आला आहे. जे स्वतः एकटे अशा ठिकाणी जातात. वाटेत जे ग्रुप अथवा स्थानिक लोकं भेटतील त्यांच्या मदतीने अशा अनवट जागा पाहायला जातात. तेव्हा आपल्याला लक्षात येते की ओळख नसली तरी बऱ्याचदा मदत मिळून जाते. आणि खऱ्या अर्थाने नव्या गोष्टी शिकायला मिळतात.
कॅम्पिंग च्या सोयी पुरवणारे बऱ्याच संस्था आहेत ज्या आपली राहण्याची आणि एकूणच ट्रेक ची काळजी घेतात. हिमालयीन ट्रेक, जंगल ट्रेक, एवरेस्ट बेस कॅम्प असे पर्याय यात आपण निवडू शकतो. हे ग्रुप बरोबर आयोजित केले\जातात आणि शक्यतो वाटाड्या अथवा माहितगार व्यक्ती आपल्या सोबत असणे गरजेचे आहे. या ब्लॉग मध्ये असलेले फोटो हे माझ्या मित्राने (नटराज) त्याच्या ग्रुप बरोबर केलेल्या ट्रेक मधील दिले आहेत.
तसेच ज्या सोयी आपण नेहमी वापरतो त्या सर्वांनाच काही सहज मिळत नसतात तरी देखील आनंदी ,समाधानी लोकं आपल्याला पाहायला मिळतात. आपली स्वतःची ओळख आपल्याला होते जसे की काही अपघात झाल्यास, किंवा कोणी खूप तक्रारी करत असेल, एखादे वेळेस रस्ता चुकलो इ . प्रसंग आपल्याला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर बनण्यास उपयोगी ठरतात.

.jpeg)




Comments
Post a Comment