19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

 ययाती मधील विचार करायला लावणारी वाक्ये



1जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही! 

2 प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो : पण तो दुसऱ्याच्या लागलेल्या ठेचानी नाही, तर स्वतः ला झालेल्या जखमानी.

3 या जगात जन्माला येणारी माणसे कुणी दीर्घायुषी होतात, कुणी अकाली मरण पावतात, कुणी वैभवाच्या शिखरावर चढतात, कुणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात. कुणी दुष्ट, कुणी सुष्ट! कुणी कुरूप, कुणी सुरूप! पण अंती ही सारी फुले मातीत मिसळून जातात. त्यांच्यामध्ये एवढे एकच साम्य असते. ही सारी फुले कधी आपल्या कहाण्या सांगतात का? मग माणसाने आपल्या जीवनाला इतके महत्व का द्यावे?मागे किर्र रान, पुढे गर्द अरण्य! असे आहे हे जीवन 

4 आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते.

5 जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. 

6 माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो.

7 जीवन हे देवालय नाही! रणांगण आहे.

8 जग शक्तीवर चालते, स्पर्धेवर जगते, भोगासाठी धडपडते.

9 जगात सर्व गोष्टी योग्य वेळी माणसाला कळतात झाडांना काही पानांबरोबर फुलं आणि फुलांबरोबर फळं येत नाहीत.स्वातीच्या पर्जन्यधारेतला बिंदू शिंपल्यात पडून मोती बनला होता.

10  माणूस शरीरावर प्रेम करतो, त्या प्रेमाला अंत नसतो. पण शरीर त्याच्यावर असे प्रेम करीत नाही.

11 जितकं वैभव अधिक तितका आत्म्याचा अधपात मोठा.

12  या जगात खरा आनंद एकच आहे ब्राह्मनंद. शरीरसूख शेवटी दुःखालाच कारणीभूत होतं. मग ते सुख स्पर्शाचे असो, अथवा दृष्टीचे असो! 

13 शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे त्याच्यावर विजय मिळवण्याकरता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याचे प्रमुख कर्तव्य आहे.

14 जग जिंकण्याइतक मन जिंकणं सोपं नाही.

15 जीवन सुंदर आहे, मधुर आहे पण त्याला केव्हा कुठून कीड लागेल याचा नेम नसतो.

16 संसार करणं हीच मनुष्याची सहजप्रवृत्ती आहे. साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगना स्थान आहे. माणसानं उपभोग घेऊ नयेत अशी जर ईश्वराची इच्छा असती, तर त्यानं त्याला शरीर दिलंच नसतं. पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे. देवानं माणसाला शरीराप्रमाणे आत्माही दिला आहे. शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याचं बंधन हवं. म्हणून माणसाचा आत्मा सदैव जागृत असायला हवा.देव विलासांचे अंध उपासक आहेत. दैत्य शक्तीची आंधळी उपासना करीत आहेत. या दोघांनाही जग सुखी करता येणार नाही.

17 या जगात जो तो आपल्याकरिता जगतो हेच खरे. 

18 .जगात राग कुणाला येत नाही? पण माणसाचं मोठेपण विकाराबरोबर वाहत जाण्यात नाही. विचाराच्या सहाय्यनं विकरावर विजय मिळवण्यातच खरा मनुष्यधर्म आहे.

19 मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रिये हे घोडे, उपभोगाचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग, आणि इंद्रिय व मन युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.



Comments

Popular posts from this blog

world heritage day