RETHINKING TOURISM -5 | MARATHI
आपण तर रिलॅक्स होण्यासाठी फिरायला जातो आणि हे कुठे अभ्यास करायला सांगतात आपल्याला ? असे मागील पोस्ट वाचल्यावर वाटले असेल . तर असा एक्दम काही अभ्यास तर होऊ शकत नाही आणि मुळात परीक्षेसारखा अभ्यास थोडीच करायचा आहे तर निरीक्षण आणि त्यानुसार थोडेसे मनन करण्याची सवय असल्यास हे आपोआप घडेल. त्याकरिता बेस्ट पर्याय म्हणजे ; आपण आता जिथे रहात आहात ते ठिकाणं अनुभवणे. याच्यात मॉल शॉपिंग , रेस्टॉरंट, मल्टिप्लेक्स, याच्याशिवाय खूप गोष्टी घडत असतात आणि आत्ता तर याचा season सुरु होतोय. हेच त्या शहराचे culture (संस्कृती) असते. कला,साहित्य ,प्रदर्शन ,क्रीडा ,संगीत कार्यक्रम ,कॅम्प ई. चा मौसम येतोय. या पैकी जे जे आपल्याला आवडते ते ते प्रत्यक्ष सहभागी अथवा बघायला सुरुवात करा. नेहमीच्या आयुष्यात आपण एवढे गुरफटलेले असतो कि कितीतरी चांगले व्याख्याते , चित्र प्रदर्शन होऊन जातात पण आपल्याला त्याची गंधवार्ता सुद्धा नसते. तर हे करायला सुरुवात करा म्हणजे actual destination ला गेल्यानंतर मोबाईल आणि फोटो मध्ये गुंतून न राहता , तेथील सभोवताल आपण अनुभवू शकतो कारण जाऊन आल्यावर आपल्याला कळते कि हे पण मस्त ...