Posts

Showing posts with the label WILD LIFE TOURISM

WILD LIFE TOURISM IN MARATHI | RETHINGKING TOURISM - 10

Image
  जंगल जंगल बात चली है पता चला है .....  लगेच पुढचे गाणे तुम्ही गुणगुणत असाल तर नक्की जंगल बुक तुम्ही पाहिली असेल. त्याबरोबरच वेगवेगळ्या सिनेमातून जंगलाचा नयनरम्य आनंद बसल्या जागी घेतला असेल. पण हे झाले virtual ! प्रत्यक्ष जंगल सफारी , निसर्ग पर्यटन, वन पर्यटन हे अनुभवायचे असेल तर आताचा season सगळ्यात भारी. कारण पाऊस नाही , रणरणतं ऊन नाही त्यामुळे जर आज पर्यंत आपण कधी जंगलात गेलो नसेल तर थंडीचा मौसम आपल्याला मानवू शकतो.  आपल्या देशात खूप जैव-विविधता आहे. आणि जस-जसे आपण वेगवेगळ्या राज्यातील जंगल अनुभवू त्या मध्ये नेहमीच वैविध्य असेल. सुरुवातीला अभयारण्य पाहुयात  तर या मध्ये विविध पक्षी , काही सरंक्षित प्राणी नीलगाय , काळवीट , माळढोक अगदी खास फुलपाखरांची सुद्धा अभयारण्य आहेत. इथून सुरुवात केली म्हणजे हळू हळू आपल्याला तेथील शांतता गूढ रम्य वातावरण , नक्की कुठे आणि कसे लक्ष द्यायचे याचा सराव होईल. तुम्हाला वाटेल याची काय गरज आहे तर आपण या प्राण्यांच्या अधिवासात जात आहोत त्यामुळे तेथील शांततेचा आपल्याकडून भंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी नाहीतर आपण लगेच फोटो काढ , गा...