WILD LIFE TOURISM IN MARATHI | RETHINGKING TOURISM - 10

 

जंगल जंगल बात चली है पता चला है ..... 

लगेच पुढचे गाणे तुम्ही गुणगुणत असाल तर नक्की जंगल बुक तुम्ही पाहिली असेल. त्याबरोबरच वेगवेगळ्या सिनेमातून जंगलाचा नयनरम्य आनंद बसल्या जागी घेतला असेल. पण हे झाले virtual !

प्रत्यक्ष जंगल सफारी , निसर्ग पर्यटन, वन पर्यटन हे अनुभवायचे असेल तर आताचा season सगळ्यात भारी. कारण पाऊस नाही , रणरणतं ऊन नाही त्यामुळे जर आज पर्यंत आपण कधी जंगलात गेलो नसेल तर थंडीचा मौसम आपल्याला मानवू शकतो. 

आपल्या देशात खूप जैव-विविधता आहे. आणि जस-जसे आपण वेगवेगळ्या राज्यातील जंगल अनुभवू त्या मध्ये नेहमीच वैविध्य असेल. सुरुवातीला अभयारण्य पाहुयात  तर या मध्ये विविध पक्षी , काही सरंक्षित प्राणी नीलगाय , काळवीट , माळढोक अगदी खास फुलपाखरांची सुद्धा अभयारण्य आहेत. इथून सुरुवात केली म्हणजे हळू हळू आपल्याला तेथील शांतता गूढ रम्य वातावरण , नक्की कुठे आणि कसे लक्ष द्यायचे याचा सराव होईल. तुम्हाला वाटेल याची काय गरज आहे तर आपण या प्राण्यांच्या अधिवासात जात आहोत त्यामुळे तेथील शांततेचा आपल्याकडून भंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी नाहीतर आपण लगेच फोटो काढ , गाणी लाव, मोठ्याने बोला हे चालू करतो. 

मला तर फक्त झाडांची नावे माहिती आहेत आणि समोर ते झाड जरी दिसले तरी खात्रीने मोजक्याच झाडांची नवे सांगू शकेन तीच गोष्ट पक्षी, प्राणी , इतर वनस्पती याला पण लागू होते. आपला सह्याद्री पर्वतरांगा तर अशा दुर्मिळ वनस्पतींचा अद्भुत साठा आहे  तर याची माहिती घ्यावी जी आपल्याला उपयोगी पडेल. जंगलात उगम पावणाऱ्या नद्या , तेथील गवताचे कुरण, प्राण्यांच्या पाणी पिण्याच्या जागा  हे सर्व अभ्यासाचा विषय आहे. 

जंगल सफारी मधून आपल्याला जंगल, प्राणी , त्यांच्या सवयी याची माहिती दिली जाते आणि जंगलाचे गाईड आपली सर्वतोपरी काळजी सुद्धा त्यामध्ये घेतात. जर तुम्हाला जंगलात ट्रेक करायचा असेल तर नक्की वाटाड्याची मदत घ्या . बऱ्याच ठिकाणी आदिवासी अशा जंगलाच्या जवळ राहतात ज्यांना जंगलाची माहिती असते त्यांना आपण माहिती विचारू शकतो तसेच त्यांची संस्कृती देखील आपण अनुभवू शकतो. बऱ्याच ठिकाणी वनविभागाने राहण्याची व्यवस्था जंगलात केली आहे अशा ठिकाणी आपण एखादी रात्र मचाणावर मस्त प्राणी, आकाश हे न्याहाळता येईल. पावसाळ्याच्या सुरुवातीला तर काजवा महोत्सव सुद्धा काही ठिकाणी आयोजित केला जातो. 

नेहमीच्या पर्यटन स्थळांबरोबरच जंगलासारखे अनोखे डेस्टिनेशन कधी तरी आपण पहिले पाहिजे एवढे मात्र खरे असे तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही. 



Comments

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day