Dr. M Visvesvaraya | Marathi Book Summary
सर विश्वेश्वरय्या ....लेखक - मुकुंद धाराशिवकर , साकेत प्रकाशन भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या चरित्रावरील छोटे पुस्तक . या मध्ये सर विश्वेश्वरय्या यांची कामाची पद्धत आणि कर्तृत्व खूप चांगल्या प्रकारे लिहिले आहे. एक निष्णात अभियंते, उद्योजक, शिक्षणतज्ञ , अर्थशास्त्री , शेतीतज्ञ ,लेखक आणि देशाच्या सर्वागीण प्रगतीसाठी कार्यरत असणारे द्रष्टे व्यक्तिमत्व . काही ठळक गोष्टी या लेखामध्ये पाहूयात १. जे प्रत्यक्ष वापरता येते आणि जगणे सोपे करते ते ज्ञान म्हणजे शिक्षण २. यशस्वी इंजिनिअर व्हायचे असेल तर स्थानिक लोकांमध्ये मिसळा. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे प्रश्न समजावून घ्या. मते जाणून घ्या. तरच खऱ्या अर्थाने यश मिळेल. ३. सोडवायचा असेल तर सरळ प्रश्नाला सामोरे गेले पाहिजे. आजचा विषय उद्यावर टाकू नये. ४. ज्या व्यक्ती प्रश्नाशी संबंधित आहेत त्यांच्याशी सरळ संवाद साधला तर प्रश्न सुटणे जाते. ५. सर्व अडचणी कागदपत्रे आकडेवारी नियम हे स्पष्टपणे मांडावे. ६. वेळेबाबत काटेकोर आणि संपूर्ण अभ्यास करून मगच कृती करण्याची हातोटी. ७. शोधा , शि...