RETHINKING TOURISM- 1
आता पावसाळा संपत आला आहे आणि सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला जायचे याचे प्लॅनिंग होत असेल. हे प्लॅनिंग करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्यास आपली ट्रिप संस्मरणीय होईल थोडे नियोजन करताना आपण नेमके कशासाठी जात आहोत हे माहित पाहिजे म्हणजे त्यानुसार आपण विविध पर्यटन स्थळे शोधू शकतो. जसे कि आपल्याला फक्त आराम करायचा आहे अथवा भरपूर ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्यानुसार आपण डेस्टिनेशन शोधल्यास आपली ट्रिप सत्कारणी लागेल. तुम्हाला हे थोडे पटणार नसेल पण साधारणपणे आपण भारतीय धार्मिक ठिकाणे ( Pilgrimage Places ), काही कार्यक्रमानिमित्त नातेवाईक अथवा मित्रमंडळी यांच्याकडे जाणे होते. मुख्य कार्यक्रम आटोपला कि वेळ असल्यास ते ठिकाण थोडे फार बघण्याचा प्रयत्न करतो. कित्येकदा तर आपणास ठाऊक देखील नसते कि आसपास प्रेक्षणीय स्थळे आहेत ते. आता इंटरनेट चा वापर करून हे सहजरित्या शोधता येईल आणि स्थानिक वर्तमानपत्र सुद्धा आपल्याला हि माहिती देऊ शकेल. जेवढे आपल्यास हि आयडिया स्पष्ट होईल त्यानुसार आपण ट्रिप आखू शकतो. खालील मुद्दे लक्षात ठेवा १. वेळ - किती दिवस आपण या ट्रिप साठी देऊ शकत...