Posts

Showing posts with the label AGRI TOURISM

AGRO TOURISM | RETHINKING TOURISM -9

Image
 मागील लेखामध्ये आपण ट्रिप कशी प्लॅन करायची ते पाहिले आता आधीचे राहिलेले पर्यटनाचे प्रकार पाहूयात  आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि आजही बहुसंख्य लोकं शेती करतात. नेहमीच्या उत्पन्नाबरोबर काही तरी शेतकऱ्याला मिळायला हवे यातून ऍग्रो टुरिझम ची सुरुवात झाली. जे काही आपण पिकवतो ते दुकानदार अथवा व्यापाऱ्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचते मात्र या मध्ये स्वतः ग्राहकच शेता मध्ये येतो आणि शेती पाहून हवे असेल ते नेऊ शकतो.  कायम तणावपूर्ण वातावरणात राहणाऱ्या लोकांसाठी शेतात जाऊन राहणे तेथील लोकजीवन जवळून पाहात त्यांच्यात मिसळून जाणे हा एक खूप चांगला stress buster होऊ शकतो.आपले स्वागत शेतात पिकलेल्या फळं , काकडी सारखे सॅलड हे देऊन नेहमीचे ब्रेकफास्ट चे पदार्थ देखील अशा ठिकाणी मिळतात.  ज्या प्रकारचे पीक तिथे घेतले जाते त्या क्रिया आपण केल्यास जसे कि नांगरट, खुरपणी, कोळपणी, बियाणे लागवड , भाज्या/ फळे कापणे , धान्याची रास करणे इ. शेतीच्या त्यावेळच्या कामाचा भाग घेऊन एक नवीन अनुभव मिळेल. बैलगाडी, ट्रॅक्टर चालवणे, शेताला पाणी देणे अशी मशीन च्या साहाय्याने होणारी कामे करता आली तर क्य...