Posts

Showing posts with the label marathi writing

AGRO TOURISM | RETHINKING TOURISM -9

Image
 मागील लेखामध्ये आपण ट्रिप कशी प्लॅन करायची ते पाहिले आता आधीचे राहिलेले पर्यटनाचे प्रकार पाहूयात  आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि आजही बहुसंख्य लोकं शेती करतात. नेहमीच्या उत्पन्नाबरोबर काही तरी शेतकऱ्याला मिळायला हवे यातून ऍग्रो टुरिझम ची सुरुवात झाली. जे काही आपण पिकवतो ते दुकानदार अथवा व्यापाऱ्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचते मात्र या मध्ये स्वतः ग्राहकच शेता मध्ये येतो आणि शेती पाहून हवे असेल ते नेऊ शकतो.  कायम तणावपूर्ण वातावरणात राहणाऱ्या लोकांसाठी शेतात जाऊन राहणे तेथील लोकजीवन जवळून पाहात त्यांच्यात मिसळून जाणे हा एक खूप चांगला stress buster होऊ शकतो.आपले स्वागत शेतात पिकलेल्या फळं , काकडी सारखे सॅलड हे देऊन नेहमीचे ब्रेकफास्ट चे पदार्थ देखील अशा ठिकाणी मिळतात.  ज्या प्रकारचे पीक तिथे घेतले जाते त्या क्रिया आपण केल्यास जसे कि नांगरट, खुरपणी, कोळपणी, बियाणे लागवड , भाज्या/ फळे कापणे , धान्याची रास करणे इ. शेतीच्या त्यावेळच्या कामाचा भाग घेऊन एक नवीन अनुभव मिळेल. बैलगाडी, ट्रॅक्टर चालवणे, शेताला पाणी देणे अशी मशीन च्या साहाय्याने होणारी कामे करता आली तर क्य...

5 am book review in marathi

Image
लवकर निजे लवकर उठे त्यास धन संपत्ती भेटे ... असे आपण लहानपानापानापासून ऐकून सोडून दिले असेल. पण खरेच हे कसे मिळेल असं आपण विचारले नसेल आणि नेमके काय केल्याने मिळेल हे कोणी सांगू शकले नसेल तर या साठी Robin Sharma लिखित The 5 am club नेमके एवढ्या पहाटे उठून काय करायचे याचे शिस्तबद्ध मार्गदर्शन विज्ञानाच्या आधारे समोर ठेवतात. जसे कि happy hormones secretion , stress  develop करणारे hormones या वरती आपण नियंत्रण कसे मिळवू शकतो जेणेकरून आपला प्रत्येक दिवस सत्कारणी लागेल.  आपण स्वतःसाठी केवळ रोज १ तास दिल्यास त्याचा किती फायदा होऊ शकतो हे यात दिलेले आहे. या साठीचा कृती आराखडा देखील दिलेला आहे. मुख्य मुद्दा पहाटे उठून हे करणे म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये झालेला बदल अनुभवता येईल.  कायम स्वरूपी आपल्याला ट्रॅक वर ठेवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. 

मी आणि ब्लॉग

Image
दिसामाजी काहीतरी लिहीत जावे असे आपण वाचलेले असते पण काय लिहायचे ? आणि कुठे लिहायचे असे प्रश्न असतात . डिजिटल मार्केटिंग करत असताना ब्लॉग बद्दल कळाले म्हणून पहिला विषय मी आणि ब्लॉग असाच घेतला. खरं तर आता आपण काही खरडत नाही पेन घेऊन मग निदान कीबोर्ड वापरून तरी लिहू म्हणजे आपले विचार स्पष्ट मांडता येतात का ? हे आपल्याला कळून येईल . रोजचे वाचन , एवढ्या दिवसातील विविध क्षेत्रातील अनुभव आपण घरातल्यान , मित्रांना सांगतो पण घर कि मुर्गी दाल बराबर सारखे प्रकार त्यापेक्षा असे लिहिलेले बरे . येणाऱ्या काळात हे लिखाण आपणास आवडेल अशी आशा आहे .