Posts

Showing posts with the label MARATHI

या भारतीय गीताने पटकवला ऑस्कर | treasuretale.blogspot.com

Image
 नाटु नाटु ने घडवला इतिहास  सर्वांच्या ओठावर असणारे आणि पाय थिरकवण्यास बाध्य करणारे RRR या चित्रपटातील नाटु नाटु या गाण्याने ओरिजिनल सॉंग या विभागात मानाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.  एम एम किरवाणी यांनी हे चंद्रबोस यांच्या या अफलातून शब्दांना संगीतबद्ध केले आहे तर राहुल सिप्लिनगुंज आणि भैरव यांनी ते गायले आहे.  मूळ तेलुगु भाषेत असणाऱ्या या गीताने अक्षरशः तमाम दुनियेला वेड लावले आहे आणि अनेक देशात ज्यु. NTR आणि रामचरण यांच्या तुफान ऊर्जेच्या  नृत्याची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न रील्स च्या द्वारे सामान्यांपासून अगदी इतक्यात उच्च पदस्थ सरकारी अधिकारी देखील याच्या तालावर नाचताना दिसले.  बाहुबली फेम  एस एस राजमौली यांनी दिग्दर्शित चित्रपटाने केवळ तिकीटबारीवर इतिहास घडवण्यासोबत आता ऑस्कर मिळवून हे सिद्ध केले आहे की संगीत हे एखाद्या देशा पुरते मर्यादित नसते तर ते इतर भाषिक लोकांना देखील आवडू शकते. मध्ये नाही का गंगम स्टाईल हे गाणे असेच लोकप्रिय झालेले. शब्द ,संगीत ,गायन या कला नेहमीच लोकांचा आवडीचा विषय राहिला आहे आणि जेव्हा याच्या जोडीला नृत्य हि सामील ह...

मराठी भाषा गौरव दिन विशेष | treasuretale.blogspot.com

Image
 मराठी भाषा गौरव दिन म्हणजे रे काय भाऊ ? .... पु.ल. देशपांडे यांचे म्हणजे रे काय भाऊ ! असे वाऱ्यावरची  वरात मधील  हा संवाद ऐकू येईल की काय असे होण्याआधीच मराठी बद्दल आस्था असणाऱ्यांना माहिती असावी या साठीच हा ब्लॉग .  ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्रेष्ठ साहित्यिक  कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा .  शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर आपल्या मायबोलीचा जागर आपण करायचा नाही तर एवढी अमृतातें पैजा जिंकणारी अशी ज्ञानेश्वरांनी ग्वाही दिलेल्या भाषेची पालखी आपणच उचलली पाहिजे.  नुकताच एका वाचनालयात घडलेला प्रसंग , एक शाळकरी मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला हा वाचनालयाचा फॉर्म भरून द्या म्हणून .. मला आश्चर्य वाटले की शाळेतील मुलगा का विचारतोय  तर तो म्हणाला मला मराठी लिहिता येत नाही , इंग्लिश मेडीयम शाळा आहे माझी. ऐकूनच सर्द झालो जर लिहिताच येणार नसेल तर तो शब्द वाचायचा कसा हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला.  शक्यतो आपले असे म्हणणे असते की एवढे काय भाषेचे काम झाले संपले पण याच बाबत विदेशात अथवा आपल्...

मेनू बद्दल माहित नसलेल्या गोष्टी | INTERESTING FACTS ABOUT MENU

Image
आज जो आपण मेनू पाहतो याची एक सोपी व्याख्या आहे ती म्हणजे पदार्थांची यादी ! याची सुरुवात ब्रिटन च्या राजाने केली. तिथे जेवणासाठी खूप सारे पदार्थांची रेलचेल असे आणि सर्व पदार्थ माहित असणे अशक्य व्हायचे तर त्यांनी एक युक्ती केली , जेवढे पदार्थ आहेत त्याची एक यादी बनवून त्यानुसार ठरवायचे की कोणते पदार्थ घ्यायचे जेणेकरून आवडीचे पदार्थ खाण्याकरिता नियोजन करणे सोपे जाईल. यात सुधारणा होत होत आजचा सर्व ठिकाणी दिसणारा मेनू तयार झाला.  हॉटेल इंडस्ट्री मध्ये प्रचलित असणारा मेनू हा आधी १७ कोर्स असणाऱ्या फ्रेंच क्लासिकल सिक्वेन्स म्हणून ओळखला जातो ज्यात प्रत्येक कोर्स मध्ये  विविध प्रकारच्या पदार्थांचा पर्याय असतो त्यामुळे एकूण पदार्थ ३४पेक्षा जास्त आणि त्यासोबत येणारे पदार्थ तर वेगळेच अशी भरगच्च मेजवानी असते त्याकरिता आपली भूक राखून ठेवणे क्रमप्राप्त आहे.एवढे सगळे खाणे आणि त्यासोबत wine अथवा इतर ड्रिंक्स चा आस्वाद घ्यायचा म्हणले तर किमान २-३तास पाहिजेत.  उत्तरोत्तर एवढा वेळ आता कोणापाशी नाही त्यामुळे यातील बरेचसे कोर्सेस एकत्रित करून सुटसुटीत पर्याय तयार झाले आहेत आठवून पहा रेस्टॉरंट ...

4 useful tips of Bhagvadgita in Marathi | सांगेन गोष्टी युक्तीच्या चार

Image
 आज गीता जयंती आहे ....  साधारण ५००० वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला भर युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर सांगितली आणि महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथात ती लिहिली. एवढा इतिहास सर्वसाधारणपणे आपल्याला माहित असेलच पण इतकी वर्षं उलटून देखील या मधील गोष्टींचे महत्व अबाधित आहे हे विशेष . खरंच असे आहे की आपली नेहमीची या डिजिटल युगातील सवय की त्या दिवसापुरते लै भारी म्हणले की झाले असे तर वाटू शकते. तर पाहुयात आत्ताच्या जमान्यात या गीतेचा रेलेव्हन्स कसा आहे ते. हि साधारण त्या हत्ती आणि आंधळ्यांची गोष्टी सारखे आहे multidimensional . तर पाहू आपल्या हाताला काय लागते ते  सर्वप्रथम यातले पहिले पात्र आहे अर्जुन , ज्याच्यामुळे हे तत्वज्ञान श्रीकृष्णाने सांगितले.  १ तर असा हा अर्जुन सामान्य माणूस थोडीच होता आजच्या भाषेत सांगायचे तर G.O.A.T. ( ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम ) असा महारथी होता  २. ज्याने  एकट्याने सर्व कौरवांना या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या काही काळ आधी  हरवले होते. ३ सर्व अस्र -शस्र  यांची माहिती असलेला   ४ अक्षय बाणांचा भाता असणारा सव्यसाची होता...

RETHINKING TOURISM -2

Image
 तुम्हाला आठवत असेल कि लहानपणी आपण दिवाळीला हमखास आपल्या गावी अथवा मामाच्या गावी जात होतो.  आता दिवाळीची सुट्टी आली कि आपण मोठी ट्रिप आखतो. हा फरक झाला आहे आता.  पण जसे आपण मागच्या लेखा मध्ये पाहिले की नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना भेटणे हा आपल्या भारतीय लोकांचा खास पर्यटनाचा हेतू असायचा याचेच आधुनिक रूप म्हणजे cultural exchange program .   दिवाळी हा तर सणांचा राजा या वेळी आपण विविध फराळाचे पदार्थ , आकाशदिवे आणि इतर बऱ्याच सजावटीच्या गोष्टी बनवत असतो. आणि माझ्या माहिती नुसार आपले चकली, चिवडा, अनारसे असे फराळाचे पदार्थ इतर राज्यातील आपले ओळखीचे लोकं अत्यंत आवडीने खातात आणि आवर्जून आपल्याला आणण्यास सांगतात. यातीलच कोणी आपली संस्कृती यामध्ये खाद्य संस्कृती , पोशाख , विविध सणाला अनुरूप सजावट , सणाचे धार्मिक ऐतिहासिक आणि आपल्या हवामानानुसार आरोग्याचे महत्व हे सगळे मुद्दे इतर संस्कृतीतून आल्याला लोकांस जाणून घेण्याची इच्छा असते.  त्यासाठी आपल्याला या सणाची योग्य माहिती असली पाहिजे म्हणजे हे सर्व आपण सांगू शकू. तुम्हाला वाटेल यांच्यात काय एवढे विशेष पण जे लोकं event ...