4 useful tips of Bhagvadgita in Marathi | सांगेन गोष्टी युक्तीच्या चार


 आज गीता जयंती आहे .... 

साधारण ५००० वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला भर युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर सांगितली आणि महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथात ती लिहिली. एवढा इतिहास सर्वसाधारणपणे आपल्याला माहित असेलच पण इतकी वर्षं उलटून देखील या मधील गोष्टींचे महत्व अबाधित आहे हे विशेष . खरंच असे आहे की आपली नेहमीची या डिजिटल युगातील सवय की त्या दिवसापुरते लै भारी म्हणले की झाले असे तर वाटू शकते. तर पाहुयात आत्ताच्या जमान्यात या गीतेचा रेलेव्हन्स कसा आहे ते. हि साधारण त्या हत्ती आणि आंधळ्यांची गोष्टी सारखे आहे multidimensional . तर पाहू आपल्या हाताला काय लागते ते 

सर्वप्रथम यातले पहिले पात्र आहे अर्जुन , ज्याच्यामुळे हे तत्वज्ञान श्रीकृष्णाने सांगितले. 

१ तर असा हा अर्जुन सामान्य माणूस थोडीच होता आजच्या भाषेत सांगायचे तर G.O.A.T. ( ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम ) असा महारथी होता 

२. ज्याने  एकट्याने सर्व कौरवांना या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या काही काळ आधी  हरवले होते.

३ सर्व अस्र -शस्र  यांची माहिती असलेला 

 ४ अक्षय बाणांचा भाता असणारा सव्यसाची होता. 

अशा व्यक्तीला मी आता काय करू? हा प्रश्न पडला त्याला आपल्या रोजच्या जगण्यास कृष्णाने जी उपयुक्त उत्तरे दिली ती अशी 

१.  तू एवढा महारथी आहेस तर तुझे मूळ कर्तव्य युद्ध करण्याचे आहे ते कर. 

  •  तुझ्यात जी गुणवत्ता आणि कौशल्ये आहेत ती वापरता येतील असं काम कर. 
  • तू फक्त तुझं काम वृथा चिंता करू नको ते माझ्यावर सोडून दे. याच्याने आपली गोंधळलेली स्थिती दूर होऊन आपण पूर्ण रिलॅक्स होऊन जातो  आणि काही कमी जास्त झाले तरी जबाबदारी घेणारं दुसरं कुणी आहे म्हणले की आपण निश्चिन्त होतो. 

२. तू  काही काळ आधीच यांचा पराभव केला होता याचे स्मरण कर. 

  • आपला सर्वात चांगला परफॉर्मन्स आठव म्हणजे परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस येईल.
३. हे तर माझे नातेवाईक ,मित्र ,सगेसोयरे आहेत तर यांच्याशी युद्ध करून मिळवलेले राज्य काय कामाचे ?

  • जे युद्धासाठी उभे आहेत त्यांना तू हि त्यांचा मित्र,नातेवाईक ,सगा सोयरा याचा विचार करत नसतील तर ऊगीच तू आठवून काही उपयोग नाही. 
  • कामाच्या ठिकाणी हे सर्वात जास्त उपयोगी पडते. 

४.  युद्धात काय होईल  याची मला खात्री नाही 

  • पूर्ण प्रयत्नाने काम करणे एवढेच आपल्या हातात आहे ते कर्तव्य नीट पार पाड बाकी वृथा चिंता नको. 
  • अपेक्षा ठेऊन काम न झाल्यास निराशा येण्याचा जास्त संभव असतो तेव्हा काम मनःपूर्वक करून स्वस्थ राहणे महत्वाचे. Anxity किंवा स्ट्रेस कमीत कमी होईल. 

अगदीच सार सांगायचे तर सुधीर फडकेंनी गायलेले मनोहर कवीश्वर लिहितात ..... विमोह त्यागून कर्म फळांचा सिद्ध होई पार्था ; कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था 


Comments

  1. उत्तम आणि ज्ञानवर्धक चिकित्सा..!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day