4 useful tips of Bhagvadgita in Marathi | सांगेन गोष्टी युक्तीच्या चार
आज गीता जयंती आहे .... साधारण ५००० वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला भर युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर सांगितली आणि महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथात ती लिहिली. एवढा इतिहास सर्वसाधारणपणे आपल्याला माहित असेलच पण इतकी वर्षं उलटून देखील या मधील गोष्टींचे महत्व अबाधित आहे हे विशेष . खरंच असे आहे की आपली नेहमीची या डिजिटल युगातील सवय की त्या दिवसापुरते लै भारी म्हणले की झाले असे तर वाटू शकते. तर पाहुयात आत्ताच्या जमान्यात या गीतेचा रेलेव्हन्स कसा आहे ते. हि साधारण त्या हत्ती आणि आंधळ्यांची गोष्टी सारखे आहे multidimensional . तर पाहू आपल्या हाताला काय लागते ते सर्वप्रथम यातले पहिले पात्र आहे अर्जुन , ज्याच्यामुळे हे तत्वज्ञान श्रीकृष्णाने सांगितले. १ तर असा हा अर्जुन सामान्य माणूस थोडीच होता आजच्या भाषेत सांगायचे तर G.O.A.T. ( ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम ) असा महारथी होता २. ज्याने एकट्याने सर्व कौरवांना या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या काही काळ आधी हरवले होते. ३ सर्व अस्र -शस्र यांची माहिती असलेला ४ अक्षय बाणांचा भाता असणारा सव्यसाची होता...