या भारतीय गीताने पटकवला ऑस्कर | treasuretale.blogspot.com
नाटु नाटु ने घडवला इतिहास
सर्वांच्या ओठावर असणारे आणि पाय थिरकवण्यास बाध्य करणारे RRR या चित्रपटातील नाटु नाटु या गाण्याने ओरिजिनल सॉंग या विभागात मानाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
एम एम किरवाणी यांनी हे चंद्रबोस यांच्या या अफलातून शब्दांना संगीतबद्ध केले आहे तर राहुल सिप्लिनगुंज आणि भैरव यांनी ते गायले आहे. मूळ तेलुगु भाषेत असणाऱ्या या गीताने अक्षरशः तमाम दुनियेला वेड लावले आहे आणि अनेक देशात ज्यु. NTR आणि रामचरण यांच्या तुफान ऊर्जेच्या नृत्याची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न रील्स च्या द्वारे सामान्यांपासून अगदी इतक्यात उच्च पदस्थ सरकारी अधिकारी देखील याच्या तालावर नाचताना दिसले.
बाहुबली फेम एस एस राजमौली यांनी दिग्दर्शित चित्रपटाने केवळ तिकीटबारीवर इतिहास घडवण्यासोबत आता ऑस्कर मिळवून हे सिद्ध केले आहे की संगीत हे एखाद्या देशा पुरते मर्यादित नसते तर ते इतर भाषिक लोकांना देखील आवडू शकते. मध्ये नाही का गंगम स्टाईल हे गाणे असेच लोकप्रिय झालेले. शब्द ,संगीत ,गायन या कला नेहमीच लोकांचा आवडीचा विषय राहिला आहे आणि जेव्हा याच्या जोडीला नृत्य हि सामील होते तेव्हा ऐकणाऱ्यास आपल्या त्या क्षणांचा विसर पडून एक वेगळी दुनियेत रममाण होता येते.
भारतीय चित्रपट मग ते कोणत्याही भाषेतील का असेना गाण्यांशिवाय ते अपूर्णच असतात त्यामुळेच गीतविरहित चित्रपट फारच थोडे आपल्याला आढळतील. एम एम किरवाणी यांचे इतरही गीते श्रवणीय आहेत जे कायमच आपल्या लक्षात राहतील.
भारतीय संगीत त्याच्या विविधतेत एकता या उक्ती प्रमाणे एकमिलाप आहे जो सिनेरसिकांना कायमच हवा हवासा वाटतो. एखादा सिनेमा यशस्वी होण्यामध्ये त्याच्या इतर बाबींबरोबर जर संगीत दणकेबाज असेल तर प्रेक्षकांपर्यंत ते अधिक जोरदार पद्धतीने समोर येते जी चित्रपट पाहण्यास प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करते. आणि आताच्या सोशल मीडिया आणि रील्स साठी तर हे पूरकच आहे ज्यामुळे जगामध्ये संगीत सर्वदूर पोहोचण्यास मदत होते.
स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटातील जय\हो या गाण्याने या पूर्वी हा पुरस्कार २००९ साली मिळवला होता.
याचबरोबर द एलिफन्ट व्हिस्परर या लघुपटाने देखील ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे , ज्यात एक केरळातील जोडपे एका हत्तीचा सांभाळ करतानाचा विषय हाताळण्यात आला आहे.
आपल्याला जशी हॉलीवूड च्या सिनेमांची प्रतीक्षा असते तशीच येणाऱ्या काळात आता नवीन काय असणार याची उत्सुकता आपल्याला असेल जी कदाचित पुढल्या वर्षी देखील अँड ऑस्कर गोज टू हे शब्द एखाद्या भारतीय कलाकृतीकरिता ऐकायला मिळतील अशी अपेक्षा करूयात तोपर्यंत नाटु नाटु !
Comments
Post a Comment