मराठी भाषा गौरव दिन विशेष | treasuretale.blogspot.com




 मराठी भाषा गौरव दिन म्हणजे रे काय भाऊ ? .... पु.ल. देशपांडे यांचे म्हणजे रे काय भाऊ ! असे वाऱ्यावरची  वरात मधील  हा संवाद ऐकू येईल की काय असे होण्याआधीच मराठी बद्दल आस्था असणाऱ्यांना माहिती असावी या साठीच हा ब्लॉग . 



ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्रेष्ठ साहित्यिक  कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा .  शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर आपल्या मायबोलीचा जागर आपण करायचा नाही तर एवढी अमृतातें पैजा जिंकणारी अशी ज्ञानेश्वरांनी ग्वाही दिलेल्या भाषेची पालखी आपणच उचलली पाहिजे. 

नुकताच एका वाचनालयात घडलेला प्रसंग , एक शाळकरी मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला हा वाचनालयाचा फॉर्म भरून द्या म्हणून .. मला आश्चर्य वाटले की शाळेतील मुलगा का विचारतोय  तर तो म्हणाला मला मराठी लिहिता येत नाही , इंग्लिश मेडीयम शाळा आहे माझी. ऐकूनच सर्द झालो जर लिहिताच येणार नसेल तर तो शब्द वाचायचा कसा हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला. 

शक्यतो आपले असे म्हणणे असते की एवढे काय भाषेचे काम झाले संपले पण याच बाबत विदेशात अथवा आपल्या दक्षिण भारतात आपण गेलो तर तेथील भाषेचा जाज्वल्य अभिमान आपल्याला सुखावतो पण आपण मात्र आपल्या भाषेचा गौरव मिरवण्यात कमी पडतो किंवा आपल्याला कमी पणा वाटतो. पण संशोधना अंती सिद्ध झाले आहे की मातृभाषेतून शिक्षण हे अधिक चांगल्या प्रकारे समजते. चीन , फ्रांस , जपान, जर्मनी सारखे देश त्यांच्या भाषेमध्ये काम करून जर एवढी प्रगती करू शकतात तर आपल्याही भाषा मुळातच समृध्द आहेत त्यामुळे आपण मागे पडू असे काही होत नसते. 

भाषा म्हणजे केवळ बोलणे ,लिहिणे आणि वाचणे एवढेच मर्यादित नसून त्याबरोबर त्या लोकांची एक संस्कृती देखील असते. यांच्याजोडीला वऱ्हाड , खान्देश , विदर्भ ,मराठवाडा ,कोंकण ,पश्चिम महाराष्ट्र असे जर आपण विभाग बघतले तर सर्व साधारण एक मराठी भाषेचा लेहजा नक्की चमकून गेला असेल. याच्याच जोडीला कितीतरी उपप्रकार गावागावातून आपल्या कानावर पडतील. हे सारे आपल्या लोकजीवनाचा भाग आहेत ज्यातून आपली खाद्य ,वस्त्र , लोकगीते, नृत्य , साहित्य,नाटक , खेळ आणि उद्योजकीय मानसिकता ही तयार होत गेली आहे. आपली मराठी तर उच्चार जरी वेगळा झाला तरी अर्थ बदलतो इतकी भारी आहे ज्यांना याची माहिती हवी असेल त्यांनी जुने विनोदी सिनेमा , कथाकथन अवश्य बघावेत बहार येईल. संगीत नाटक ,लावणी ,शाहिरी ,पोवाडा , ओव्या ,अभंग , वारी असे जरतारी लेणं आहेत जी महाराष्ट्राची ख्याती आहे. 

त्यामुळे याची महाराष्ट्रात जन्म होऊन जर आपण मजा घेणार नसू तर काय उपयोग. संत साहित्य जसे की ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत ,दासबोध हे जर आपण वाचले अभ्यासले तर ज्ञानभाषा आणि भाषेची समृध्दता आपल्याला अनुभवता येईल. जी वाक्यं आपण सभा-समारंभात ऐकतो ती या संत साहित्यातिलच आहेत. जी परंपरा आपल्या साहित्यिक मंडळींनी जोपासायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. 

सध्याच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या जमान्यात जर आपण नीट पाहिले तर जास्तीत जास्त बोलीभाषेचा डेटा मिळवला जातोय जेणेकरून हे तंत्र सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल. भारत सरकारचा भाषिणी ( BHASHINI) नावाचा असाच खास भारतीय भाषांकरिता असलेला एक प्रकल्प आहे ज्यामध्ये आपणही सहभागी होऊन हि माहिती जास्त अस्सल करू शकतो. मराठी वेब सिरीज , कन्टेन्ट खूप पाहिला जातो ज्यातून नवीन माध्यमातून मराठी जगभर पोहोचते. 

छत्रपती शिवरायांपासून ते महाराष्ट्राच्या निर्मिती साठी हौतात्म्य पत्करलेल्या करिता तरी मराठीचा गौरव वाढवणे हे आपले कर्तव्य राहते. 


Comments

  1. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।🙏🏻 👌🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day