AGRO TOURISM | RETHINKING TOURISM -9


 मागील लेखामध्ये आपण ट्रिप कशी प्लॅन करायची ते पाहिले आता आधीचे राहिलेले पर्यटनाचे प्रकार पाहूयात 

आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि आजही बहुसंख्य लोकं शेती करतात. नेहमीच्या उत्पन्नाबरोबर काही तरी शेतकऱ्याला मिळायला हवे यातून ऍग्रो टुरिझम ची सुरुवात झाली. जे काही आपण पिकवतो ते दुकानदार अथवा व्यापाऱ्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचते मात्र या मध्ये स्वतः ग्राहकच शेता मध्ये येतो आणि शेती पाहून हवे असेल ते नेऊ शकतो. 

कायम तणावपूर्ण वातावरणात राहणाऱ्या लोकांसाठी शेतात जाऊन राहणे तेथील लोकजीवन जवळून पाहात त्यांच्यात मिसळून जाणे हा एक खूप चांगला stress buster होऊ शकतो.आपले स्वागत शेतात पिकलेल्या फळं , काकडी सारखे सॅलड हे देऊन नेहमीचे ब्रेकफास्ट चे पदार्थ देखील अशा ठिकाणी मिळतात.  ज्या प्रकारचे पीक तिथे घेतले जाते त्या क्रिया आपण केल्यास जसे कि नांगरट, खुरपणी, कोळपणी, बियाणे लागवड , भाज्या/ फळे कापणे , धान्याची रास करणे इ. शेतीच्या त्यावेळच्या कामाचा भाग घेऊन एक नवीन अनुभव मिळेल. बैलगाडी, ट्रॅक्टर चालवणे, शेताला पाणी देणे अशी मशीन च्या साहाय्याने होणारी कामे करता आली तर क्या बात है . हे सगळे करण्यात किती कष्ट आहेत आणि नेमके पीक कसे तयार होते ते पाहता येते. 

हा झाला एक भाग पण ज्यांना अशी कामे करण्यात इंटरेस्ट नाही ते मस्त पैकी विहीर अथवा नदी वर पोहण्याचा आनंद घेऊन तिथे असलेल्या फळबागेतील फळे स्वतः तोडून त्याचा आस्वाद घेतील. तेथील आमराई वड  चिंच या झाडांच्या सावलीत शेतात बनवलेल्या मस्त जेवणानंतर आराम अथवा खेळ खेळतील. इथेच एखादा झोका असेल तर  भारीच होईल. शिवार फेरी चालत अथवा बैलगाडीतून करता येईल. 

ज्यांना राहण्याची इच्छा असेल तर मस्त बाहेरून झोपडी आणि आतून आपल्या नेहमीच्या रूम सारख्या बेसिक सोयी सुविधा असलेल्या खोल्यांमध्ये आपण ग्रामीण जीवनाचा भाग होऊन जातो. रात्रीच्या वेळी चांदण्या पाहत आकाशदर्शन , शेकोटी भोवती बसून गप्पाष्टक मांडता येईल. तेथील प्रदूषणमुक्त गार वारा अंगावर घेत कधी झोप\लागेल हे कळणार देखील नाही. आपल्याला मस्त उगवतीलाच जग येईल मग ती कोंबड्यांची आरवण्याने असेल किंवा पक्ष्यांचा किलबिलाट, आणि जनावरांचे गोठ्यातील आवाजाने होईल. खूपच भाग्यवान असेल तर तेथील गाई म्हशींचे निरसे दूध पिता येईल. 

थोडक्यात जेवढ्या ऍक्टिव्हिटी शेतातील लोकं करतात ती एखादा दिवस आपण करायची आणि परत निघताना souvenier म्हणून फळं ,भाज्या, धान्य, लोणची, मसाले यांचा वानोळा आपण परडीत घेऊन घरी निघतो. 


 आता तर हुरडा , पोपटी असे पॅकेज आपल्याला शेतात मिळतात त्यातून आमची माती आमची माणसं हा प्रोग्राम जवळून पाहता येईल


Comments

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day