RETHINKING TOURISM- 4



 चला आता तुम्ही एक तर ट्रीपला जाऊन आला असाल अथवा ट्रिप चालू असेल ... 

शक्यतो आपण जे destination निवडतो ते आपल्याकडे असणारा वेळ, budget , आणि आपले dream destination याचा विचार करून नक्की करतो. हे ठिकाण natural अथवा man - made या प्रकारातील असते. आता तुम्ही एक निरीक्षण करा कि ज्यासाठी म्हणून आपण ट्रिप ला गेलो होतो तर तिथला अनुभव चांगला आणि ठीक असा लिहून काढा म्हणजे आपण ते ठिकाण किती प्रमाणात अनुभवले आहे ते कळेल. का उगीच येरझार झाली हे पहा. 


एखाद्या ठिकाणी आपण गेलो कि शक्यतो तेथील architecture , engineering मास्टर पीस अशा स्थळी फोटो काढतो. हे करत असताना आजूबाजूची जैवविविधता ( Biodiversity ) हि जर अनुभवता आली तर ट्रिप खूप सार्थकी लागेल. आणि विशेषतः जर तुमच्याबरोबर मुले असतील तर यांना या सर्व निसर्गनिर्मित गोष्टींची माहिती आपण सांगू शकतो जी त्यांना अभ्यासाबरोबरच स्वतःची passion शोधायला मदत करेल. या साठी ट्रिप झाल्यावर एक रिपोर्ट तुम्ही लिहून काढा जसे आपण कॉलेज मध्ये industrial visit झाल्यावर करत असू. 

तुम्हाला वाटेल याचा काय उपयोग तर मध्ये सुधा मूर्तींची मुलाखत ऐकली त्यावेळेस त्यांनी सांगितले कि हि रिपोर्ट लिहिण्याची सवय त्यातुन लेखिका होण्यास मदत झाली. यातून आपण जे शिकतो ते भविष्यात तुम्ही एखादे सरकारी अधिकारी (MPSC / UPSC ), लेखक ,दिगदर्शक म्हणून काम करताना उपयोगी पडेल. 


मला वाटते जे ठिकाण तुम्ही visit करणार आहात तेथील सूर्योदय ( sunrise) ,सूर्यास्त  sunset आणि शक्य असल्यास पौर्णिमा (full moon ) हे अनुभवा . अनुभवा याचा अर्थ शब्द स्पर्श रूप रस आणि गंध अशा ५ senses जिथे वापरतो अशी गोष्ट. 


तुमचा अनुभव नक्की शेअर करा. 






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day