8 TIPS FOR PERFECT TRIP PLANNING | ITINERARY PLANNING IN MARATHI


 सुट्ट्यांचा हंगाम चालू होतोय आणि नववर्ष स्वागतासह सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी चांगले डेस्टिनेशन तुम्ही शोधून ठेवले असतीलच तर याच्याजोडीला परफेक्ट प्लॅन करता आला तर हि ट्रिप memorable होईल तर बघू यासाठी काय काय माहिती असणे आवश्यक आहे ते 

  1. वेळ - आपल्याकडे असलेला वेळ किती आहे त्यानुसार शोधलेल्या डेस्टिनेशन च्या आजूबाजूचे कुठले पॉईंट्स बघायचे आणि नाही ते आपण ठरवू शकतो. बरयाचदा खूप जास्त पॉईंट्स कव्हर करण्याच्या नादात , ज्या साठी म्हणून ट्रिप प्लॅन केली जाते ते भर्र्कन क्षण निघून जातात.  शक्यतो एखादा दिवस राखीव ठेवता येईल या हिशोबाने प्लॅनिंग करावे म्हणजे दगदग झाल्यासारखे वाटणार नाही. 
  2. बजेट - या ट्रिप साठी किती पैसे खर्च करायचे हे निश्चित करा म्हणजे ट्रिप इकॉनॉमिकल होईल. ऑनलाईन पेमेंट, चेक्स, आणि कॅश हे जवळ ठेवा. जेवढे सुयोग्य नियोजन असेल तेवढा खर्चाचा ताळमेळ घालणे सोपे 
  3.  व्यक्ती - किती जणं जाणार आहेत  त्यामध्ये आपण लहान मुले, घरातील वडीलधारे आणि स्री - पुरुष यानुसार एखाद्या ठिकाणी जाण्याची आणि पोहोचण्याची वेळ ठरवता येईल. हि माहिती किती स्पॉट कव्हर करायचे या साठी उपयोगी आहे कारण सर्वांबरोबर जायचे असल्याने साहजिक एखाद्या डेस्टिनेशन अथवा स्पॉट ला वेळ जास्त लागेल. हॉटेल , ट्रेन/बस, cruise बुकिंग करताना ग्रुप बुकिंग साठी सवलत मिळू शकते आणि जर तुम्ही गाडी ठरवून जाणार असाल तर किती लोकं आहेत त्यानुसार योग्य गाडी निवडू शकता. त्यानुसार आवश्यक औषधे जवळ ठेवावीत. जी emergency मध्ये वापरता येतील. 
  4. हॉटेल बुकिंग - सध्या ऑनलाईन बुकिंग करून बऱ्याच ऑफर असतात आपण त्यातील एखादी निवडू शकता किंवा प्रत्यक्ष पोहोचल्यावर शोधू शकता हे आपल्या डेस्टिनेशन नुसार निवडू शकता. कारण डिमांड अँड सप्लाय यानुसार रेट आणि बुकिंग चार्जेस ठरतात. एरवी फ्री कॅन्सलेशन असते पण या काळात काय नवीन टर्म्स आहेत ते नक्की चेक करा. रेग्युलर हॉटेल व्यतिरिक्त होम-स्टे , संपूर्ण वीला बुकिंग,शॅक्स, हॉस्टेल्स, टेन्ट असे भरपूर पर्याय आहेत.आणि जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर मोठ्या स्टेशनवरती रेल्वेचे स्वतःचे लॉजेस आहेत जे पुढील प्रवासाचे  कन्फर्म reservation असणाऱ्या प्रवाशांना मिळू शकते . 
  5. ट्रॅव्हलिंग मोड - डेस्टिनेशन नुसार ट्रेन, विमान,बस ,स्वतःचे वाहन असे जे सोयीस्कर पर्याय आहेत ते आपण निवडू शकतो. त्यानुसार लागणारी documents आपल्याला जवळ ठेवावी लागतील. जिथे नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी हार्ड कॉपी ठेवा म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि मनस्ताप पण होणार नाही. जेवढा आरामदायक पर्याय निवडाल तेवढा ट्रिप मध्ये जास्त आनंद घेता येईल. 
  6. ट्रिप energy -  वरील सर्व माहिती बघितल्यावर आपण हे ठरवू शकतो कि किती स्पॉट कव्हर करायचे आहेत , शक्यतो एका दिवशी खूप जास्त आणि एखाद्या दिवशी कमी असे नियोजन करू नका . सगळ्यांची बॉडी energy चा विचार करावा लागतो, specially Adventure destination साठी.  याची काळजी घेतली संपूर्ण ट्रिप मध्ये उत्साह आणि ताजेपणा राहील. 
  7. टुरिस्ट स्पॉट प्लॅनिंग - डेस्टिनेशन ठरले आणि अवतीभोवतीचे स्पॉट ठरवण्याकरता एक मॅप मिळवा किंवा तयार करा जेणेकरून त्याच त्याच ठिकाणी परत येतो किंवा उगीच हेलपाटा झाला असे व्हायला नको. जर तुम्ही हेरिटेज sight बघणार असाल तर साप्ताहिक सुट्ट्या , भेटीचा वेळ हे सर्व ठिकाणचे आधीच माहित करून घ्या.जिथे गाईड ची मदत लागणार असेल तिथे नक्की त्यांची मदत घ्या.  शॉपिंग साठी वेळ याच्यात राखीव ठेवा. 
  8. Quick  टिप्स - तारीख, वेळ नुसार पेपर वरती प्लॅन करा ज्यामध्ये , त्या-त्या-दिवशीचे स्पॉट,ऍक्टिव्हिटी ,जेवणाच्या वेळा , गाड्यांच्या वेळा , अशी सर्व माहिती प्रत्येकाला मिळेल याचा आराखडा द्या. 

Comments

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day