NEW YEAR |नेमेची येतो
सालाबादप्रमाणे यंदाही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे आणि जुने कॅलेंडर मध्ये झालेला संवाद
न. कॅ. - जुने जाऊद्या मरणालागुनी ....
जु कॅ - बरं बाबा ये माझ्या जागी
न. कॅ - अब वक्त भी हमारा है , भिंत भी हमारी , खिळा भी हमारा
जु कॅ - एवढ्या काही फुशारक्या मारू नको, एक वर्षपूर्वी मीही असाच शेफारून गेलो होतो . तुझे असं होऊ देऊ नको
न. कॅ- हा हे मात्र खरे आहे
जु कॅ- आता कसं ! आपली फक्त जागा बदलते , पंत गेले राव आले त्यासारखे
न. कॅ - असं कसं ? नवीन वर्ष म्हणजे किती तरी नवीन संधी म्हणून तर एवढ्या जोरात स्वागत करतात की आपले
जु कॅ- हा पण आपण फक्त तारखा दाखवतो त्यासंस्मरणीय करणे थोडेच आपल्या हातात आहे
न. कॅ - छ्या मला नाही पटत . आता ज्याने मला इथे आणले त्याने बघ किती नव वर्षाचे संकल्प केलेत ते
जु कॅ- हा हा हा दिखावे पे मत जाओ
न. कॅ- म्हणजे !
जु कॅ- याच्यातले बरेच माझ्या वेळचेच आहेत हे बघ माझ्यावर लिहून ठेवलेल्या नोंदी
न. कॅ - हा खरंय रे
जु कॅ - म्हणून तर म्हणालो आपण फक्त तारखा दाखवतो. हेच लोकं सुविचार सांगतात किती जगलात त्यापेक्षा कसे जगलात हे महत्वाचे आणि काय काय बच्चन मारतात.
न. कॅ- म्हणजे नव्याचे नऊ दिवस म्हणायचे तर
जु कॅ- ते पण नाही . कधी कधी तर महिनोन महिने पान सुद्धा उलटत नाहीत. एवढा सगळ्यांना विसर पडतो. मी आपला विसर नाही म्हणत उगवला दिवस कि लागले कामाला आणि मावळला कि पुढच्या दिवसाचे नियोजन तारीख कशाला कोण लक्षात ठेवेल.
न. कॅ- असे असेल तर संकल्प पूर्ण कसे होणार? आपण नुस्तेच भिंतीवरून बघत राहायचे का?
जु कॅ - आपण भगवद्गीता पाळू - तटस्थ पणे पाहायचे . ज्याला बदल करायचा आहे त्याने नवीन वर्षाची का वाट बघायची. उगवणारा प्रत्येक दिवस नित्य नूतन आहे असे मन प्रसन्न ठेवल्यास बघ कसे वाटते ते.
न. कॅ- हो रे किमान मी तर रोज भिंतीवरून बघताना असेच करेन .
जु कॅ- चल निघतो मी आता, अधे मध्ये भेटत राहू , बघ माझी आठवण येते का ?
शुभेच्छा तुला.

Best👌🏻
ReplyDeleteलेख छान आहे.
ReplyDelete