7 INTERESTING FACTS OF THE TAJ MAHAL PALACE HOTEL | MARATHI
आपल्याला फाईव्ह स्टार हॉटेल बद्दल कायमच कुतूहल असते तर आज आपण भारतातील पहिले luxury हॉटेलची माहिती बघूयात . तुम्हाला नक्कीच कळले असेल कि कोणत्या हॉटेल बद्दल मी बोलत आहे ते
दूरदृष्टी असणारे प्रख्यात उद्योजक सर जमशेटजी टाटा यांनी यांनी सन १८९८ मध्ये भूमिपूजन केलेले आणि १६ डिसेंबर १९०३ साली १७ गेस्ट पासून भारतीय हॉटेल उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. ताज महल पॅलेस हे पहिले भारतीय आलिशान सर्व सुखसोयींनी युक्त ( luxury ) पंचतारांकित हॉटेल निर्माण केले. रावसाहेब वैद्य आणि D N Mirza या भारतीय वास्तुविशारदांनी याचे design आणि सोराबजी कॉन्ट्रॅक्टर यांनी बांधकाम केले. या नंतर गेट वे ऑफ इंडिया १९११ साली पायाभरणी झाली.आपल्याला ठळकपणे दिसणारा लाल रंगाचा डोम हा वास्तुकलेचा विशेष नमुना आहे. हा २४० फुटाचा डोम आजही इंडियन नेव्ही साठी दिवसाच्या वेळेच्या अंदाजासाठी कामी येतो.
लाईट असणारे हे पहिले भारतीय हॉटेल असून त्यासोबत अमेरिकन फॅन , जर्मन लिफ्ट, मुंबईतील पहिला परवाना असलेला बार ,नाईट क्लब , दिवसभर चालू असणारे रेस्टॉरंट शामियाना , जापनीज रेस्टॉरंट वसाबी , असे खूप सारे वैविध्यपूर्ण आदरातिथ्य सेवा पहिल्यांदाच दिल्या गेल्या.
हे हॉटेल महत्वाच्या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिलेले आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी (१९१४-१९१८) या दरम्यान ६०० बेड चे हॉस्पिटल इथे करण्यात महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू , सरदार पटेल . खान अब्दुल गफार खान, जिना असे सर्व स्वातंत्र्य चळवळीच्या बैठकीसाठी इथे एकत्र येत. १९४७ साली लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याची घोषणा द ताज महल पॅलेस येथूनच केली होती.येथील विविध खानपान सेवांबरोबरच ४००० पेक्षा जास्त कलात्मक वस्तू येथील भिंतींवर आहेत ज्यापैकी २०० पेंटिंग आहेत. येथील सूट रूम आणि कॉरिडॉर हे भारताचा ऐतिहासिक आणि कलात्मक प्रवास दर्शवतात.
या हॉटेल मध्ये जगातील महत्वाच्या व्यक्ती किंग जॉर्ज V , क्वीन मेरी , दलाई लामा ,बिल आणि हिलरी क्लिंटन ,बराक ओबामा, निल आर्मस्ट्राँग,जॉर्ज बर्नार्ड शॉ , द बीटल्स ,जुबिन मेहता, अल्फ्रेड हिचकॉक अशा नामवंतांनी येथील पाहुणचार घेतला आहे.
द ताज महल हॉटेल पॅलेस हे भारताचे आदरातिथ्य विभागातील सरताज आहे हे निश्चित. आज ११९ वर्ष हे हॉटेल पूर्ण करत आहे ही अभिमान आणि गौरवाची बाब आहे.

Comments
Post a Comment