सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव | RETHINKING TOURISM | treasuretale.blogspot.com
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव ... कणेरी मठ ,कोल्हापूर
दैनंदिन आयुष्यात पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, वायू, आकाश , तेज हे आपल्याला माहिती असते पण याची निर्मिती कशी होते , याचे महत्व काय आणि आपल्या जीवनावर यांचा कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी इथे मॉडेल तयार केली आहेत जेणेकरून हि सर्व माहिती सहज रित्या आपल्याला कळू शकेल.
सद्य स्थितीत आपण पर्यावरण विषयी खूप सजग झालो आहोत तर जो पर्यंत याची नीट माहिती आपण घेत नाही तोवर संवर्धन म्हणजे नेमके काय करायची अगदी आपल्या नेहमीच्या सवयी जरी बदलल्या तरी किती मोठे काम यातून होऊ शकते याची उदाहरणे या ठिकाणी पाहायला मिळतील. खरं तर हि माहित असतील पण तितके महत्व लक्षात न आल्याने आपण निष्काळजीपणे वापरतो तर थोडी जागरूकता निर्माण होईल आणि सुयोग्य बदल घडून आला तर बऱ्याच प्रदूषणाच्या समस्या कमी करण्यास आपला हातभार लागेल.
प्लॅस्टिक , इ -वेस्ट , अशा प्रकारचा कचरा कसा रिसायकल करायचा याचे प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळतील. त्या जोडीने यातून आपल्याला जर एखादा उद्योग सुरु करायचा असेल ते इथे आयडिया मिळेल.
सेंद्रिय पदार्थांविषयी इथे फार चांगला प्रकल्प आहे. शहरात आपण ज्या भाज्या फळे खातो ते कितपत सेंद्रिय असतात याची काही माहिती आपणास मिळू शकत नाही आणि ज्यांना स्वतःचे भाज्या फळे तयार करण्याइतकी जागा आहे ते इथे हे गॅलरी अथवा गच्चीवर कसे आपण पिकवू शकतो याची माहिती घेता येईल. शेवटी आपण स्वतः पिकवलेले खाण्यात एक वेगळेच समाधान असते.
कणेरी मठ तर तेथील ग्रामीण पर्यटनासाठी प्रसिद्धच आहे. बारा बलुतेदार , लोकसंस्कृती , त्यांची कामे याचे कायमस्वरूपी प्रदर्शन इथे पुतळ्यांच्या माध्यमातून वसलेल्या गावातून पाहायला मिळते.
नेहमीच्या पर्यटनाबरोबरच आध्यात्मिक, वैज्ञानिक , पर्यावरण आणि आपल्या आरोग्यपूर्ण जीवनशैली विषयी परिपूर्ण अनुभव आपल्याला मिळेल.

Comments
Post a Comment