Posts

Showing posts from October, 2022

RABBIT- TURTLE STORY | MARATHI

Image
 

RETHINKING TOURISM - 3

Image
 पहिला प्रवास साधारण सण आणि कार्यक्रमाकरिता आपण करतो हे मागील ब्लॉग मध्ये पाहिले आहे. त्याच बरोबर आपले हे सण cultural tourism साठी खूप मोठी संधी आहे.  तर हा असा बालपणीचा प्रवास आता १० वी आणि १२ वी चा काळ येईपर्यंन्त बऱ्यापैकी नियमित सुरु असतो आणि मग त्यामध्ये एक ब्रेक येतो. मग जसे आपले ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन होते तेव्हा तेव्हा परत आपली गाडी मै उडना चाहता हूं ... दौडना चाहता हूं अशी सुरु होते.  यात आपले सर्वांचे आवडते ठिकाणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि गोवा . काही दिवस पावसाळी ट्रेक आणि मित्रांबरोबर आपल्यासाठी unexplored असलेले tourist spot आपण पाहतो अनुभवतो. या मध्ये फक्त कुणी म्हणायचा अवकाश की आपण सुटतो. आणि आता तर हे instagram , आणि इतर social media वर जास्त करून इतरांना  दाखवण्यासाठी आपण जात असतो कारण ते ठिकाण अनुभवण्यापेक्षा आपले लक्ष स्वतःचे फोटो घेण्यातच जास्त असते. असो...  आणि जसे आपण जॉब अथवा busines मध्ये पदवी मिळवल्यावर अडकून पडतो मग वरचा dialogue सुद्धा आठवत नाही याचेच तर आपल्याला या rethinking tourism मधून सिंहावलोकन करायचे आहे. जे ...

5 Benefits of Reading | Marathi

Image
 वाचन प्रेरणा दिन  भारतरत्न डॉ. A P J अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो.  आपल्याला सुविचार माहित असतो वाचाल तर वाचाल पण जमतेच असे नाही तर आपण वाचनाचे फायदे पाहू  १. आपल्या आवडीची माहिती आपल्यासाठी तयार मिळते.  २. रात्री जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर पुस्तक परिणामकारक आहेत.  ३. सेलेब्रिटी प्रमाणे आपण देखील सांगू शकतो सध्या काय वाचत आहोत ते.  ४. वेळ सत्कारणी लावण्यासाठी पुस्तकाएवढा चांगला पर्याय नाही.  ५ बसल्याजागी आपण जग फिरून येऊ शकतो ते पण आपल्या सोयीनुसार.  तरी वाचन होत नसेल तर खालील युक्त्या वापरून पहा  १. एखादे शासकीय ग्रंथालयाचे वर्गणीदार व्हा. दंड होऊ नये म्हणून आपण वेळेत वाचू .  २. नुस्ते वाचून काय उपयोग असे जर वाटत असेल आणि वेळ कमी आहे तर खालील व्हिडिओ समरी उपयुक्त आहे  -  ३. काही चांगले ब्लॉग वाचा. 

RETHINKING TOURISM -2

Image
 तुम्हाला आठवत असेल कि लहानपणी आपण दिवाळीला हमखास आपल्या गावी अथवा मामाच्या गावी जात होतो.  आता दिवाळीची सुट्टी आली कि आपण मोठी ट्रिप आखतो. हा फरक झाला आहे आता.  पण जसे आपण मागच्या लेखा मध्ये पाहिले की नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना भेटणे हा आपल्या भारतीय लोकांचा खास पर्यटनाचा हेतू असायचा याचेच आधुनिक रूप म्हणजे cultural exchange program .   दिवाळी हा तर सणांचा राजा या वेळी आपण विविध फराळाचे पदार्थ , आकाशदिवे आणि इतर बऱ्याच सजावटीच्या गोष्टी बनवत असतो. आणि माझ्या माहिती नुसार आपले चकली, चिवडा, अनारसे असे फराळाचे पदार्थ इतर राज्यातील आपले ओळखीचे लोकं अत्यंत आवडीने खातात आणि आवर्जून आपल्याला आणण्यास सांगतात. यातीलच कोणी आपली संस्कृती यामध्ये खाद्य संस्कृती , पोशाख , विविध सणाला अनुरूप सजावट , सणाचे धार्मिक ऐतिहासिक आणि आपल्या हवामानानुसार आरोग्याचे महत्व हे सगळे मुद्दे इतर संस्कृतीतून आल्याला लोकांस जाणून घेण्याची इच्छा असते.  त्यासाठी आपल्याला या सणाची योग्य माहिती असली पाहिजे म्हणजे हे सर्व आपण सांगू शकू. तुम्हाला वाटेल यांच्यात काय एवढे विशेष पण जे लोकं event ...

RETHINKING TOURISM- 1

Image
आता पावसाळा संपत आला आहे आणि सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला जायचे याचे प्लॅनिंग होत असेल. हे प्लॅनिंग करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्यास आपली ट्रिप संस्मरणीय होईल  थोडे नियोजन करताना आपण नेमके कशासाठी जात आहोत हे माहित पाहिजे म्हणजे त्यानुसार आपण विविध पर्यटन स्थळे शोधू शकतो. जसे कि आपल्याला फक्त आराम करायचा आहे अथवा भरपूर ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्यानुसार आपण डेस्टिनेशन शोधल्यास आपली ट्रिप सत्कारणी लागेल.  तुम्हाला हे थोडे पटणार नसेल पण साधारणपणे आपण भारतीय धार्मिक ठिकाणे ( Pilgrimage Places ), काही कार्यक्रमानिमित्त नातेवाईक अथवा मित्रमंडळी यांच्याकडे जाणे होते. मुख्य कार्यक्रम आटोपला कि वेळ असल्यास ते ठिकाण थोडे फार बघण्याचा प्रयत्न करतो. कित्येकदा तर आपणास ठाऊक देखील नसते कि आसपास प्रेक्षणीय स्थळे आहेत ते. आता इंटरनेट चा वापर करून हे सहजरित्या शोधता येईल आणि स्थानिक वर्तमानपत्र सुद्धा आपल्याला हि माहिती देऊ शकेल.  जेवढे आपल्यास हि आयडिया स्पष्ट होईल त्यानुसार आपण ट्रिप आखू शकतो.  खालील मुद्दे लक्षात ठेवा  १.  वेळ - किती दिवस आपण या ट्रिप साठी देऊ शकत...

चहा टाळ्या

Image