Posts

Showing posts from April, 2025

world heritage day

Image
जागतिक वारसा दिन  खरे तर हा दिवस उत्तम ऐतिहासिक वास्तूंचा म्हणून ओळखला जातो पण खरंच वारसा म्हणजे नक्की काय? एखाद्या वास्तू पुरता मर्यादित असतो का ? नाही ना ! तर आपली आधीची ओळख जी आपण जपण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे वारसा नाहीतर आपण सध्याच्या मॉडर्न जगात जेव्हा आपल्याला अस्सल , ठळक गोष्ट हवी असते मग आपण धुंडाळतो तो म्हणजे वारसा मग ते पदार्थ , कपडे , भाषा , व्यवहार , संस्कार अशा सर्व गोष्टी ज्या कळत नकळत पणे आपल्या पर्यंत येतात आणि ह्या साऱ्या गोष्टींचे साक्षीदार ह्या वास्तू असतात .  आपण एखादी वास्तू जेव्हा पाहतो त्या बरोबर त्याचे भौगोलिक , राजकीय, सामाजिक , आर्थिक इ महत्व सांगू पाहतो .  अशा पद्धतीने जेव्हा आपण ते पाहतो तेव्हा त्यातील बारकावे लक्षात येतात उदा एखादा किल्ला हा इथेच का बांधला हे जेव्हा वरील गोष्टींचा आपण विचार केला तर त्या विषयीचे सखोल माहिती सहज मिळू शकते नाहीतर फोटो तर ढीग काढले पण आहे काय काय माहीत असा प्रकार ? तुम्हाला एवढं माहित करून उपयोग काय , अहो नाहीतर research काय असतो जे आधी केले त्यातच सुसंगत आधुनिक बदल घडवणे .  या साठी हेरिटेज ठिकाणीच गेले पा...

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

Image
  ययाती मधील विचार करायला लावणारी वाक्ये 1जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही!  2 प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो : पण तो दुसऱ्याच्या लागलेल्या ठेचानी नाही, तर स्वतः ला झालेल्या जखमानी. 3 या जगात जन्माला येणारी माणसे कुणी दीर्घायुषी होतात, कुणी अकाली मरण पावतात, कुणी वैभवाच्या शिखरावर चढतात, कुणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात. कुणी दुष्ट, कुणी सुष्ट! कुणी कुरूप, कुणी सुरूप! पण अंती ही सारी फुले मातीत मिसळून जातात. त्यांच्यामध्ये एवढे एकच साम्य असते. ही सारी फुले कधी आपल्या कहाण्या सांगतात का? मग माणसाने आपल्या जीवनाला इतके महत्व का द्यावे?मागे किर्र रान, पुढे गर्द अरण्य! असे आहे हे जीवन  4 आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते. 5 जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं.  6 माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. 7 जीवन हे देवालय नाही! रणांगण आहे. 8 जग शक्तीवर चालते, स्पर्धेवर जगते, भोगासाठी धडपडते. 9 जगात...