ययाती मधील विचार करायला लावणारी वाक्ये 1जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही! 2 प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो : पण तो दुसऱ्याच्या लागलेल्या ठेचानी नाही, तर स्वतः ला झालेल्या जखमानी. 3 या जगात जन्माला येणारी माणसे कुणी दीर्घायुषी होतात, कुणी अकाली मरण पावतात, कुणी वैभवाच्या शिखरावर चढतात, कुणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात. कुणी दुष्ट, कुणी सुष्ट! कुणी कुरूप, कुणी सुरूप! पण अंती ही सारी फुले मातीत मिसळून जातात. त्यांच्यामध्ये एवढे एकच साम्य असते. ही सारी फुले कधी आपल्या कहाण्या सांगतात का? मग माणसाने आपल्या जीवनाला इतके महत्व का द्यावे?मागे किर्र रान, पुढे गर्द अरण्य! असे आहे हे जीवन 4 आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते. 5 जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. 6 माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. 7 जीवन हे देवालय नाही! रणांगण आहे. 8 जग शक्तीवर चालते, स्पर्धेवर जगते, भोगासाठी धडपडते. 9 जगात...
Comments
Post a Comment