RETHINKING TOURISM- World Tourism Day
आपल्या सर्वाना बाहेर फिरायला खूप आवडत असते. कधी एकदा जोडून सुट्ट्या मिळतात आणि पळतो याची वाटच बघत असतो .
हे पर्यटन जास्त चांगल्या पद्धतीने पर्यटकांना करता यावे या साठी जगभरात UNWTO हि संस्था काम करते. ही संस्था २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस साजरा करत असते. या वर्षीचा कार्यक्रम इंडोनेशिया येथे आहे. या वर्षीच थिम आहे Rethinking Tourism .
मागील २ वर्षाचा कोरोना काळात या पर्यटन उद्योगाला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले आणि आपल्याला देखील बाहेर न पडता आल्यामुळे हुरहूर वाटत असेल. तर आपण या निवांत दिवसात कधी विचार केला
आहे का ? की मी फिरायला जातो / जाते ते नेमके कशासाठी आणि मी मिळवतो काय यातून
तुम्ही हे ऐकले असेल .. केल्याने देशाटन मनुजा येते शहाणपण तर आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी हे पर्यटन उपयुक्त असते. याचाच विचार UNWTO या वर्षीच्या थिम मधून करते आहे. आणि आपण ही संपूर्ण वर्ष हे बघत राहू.
Comments
Post a Comment