RETHINKING TOURISM - 3

 पहिला प्रवास साधारण सण आणि कार्यक्रमाकरिता आपण करतो हे मागील ब्लॉग मध्ये पाहिले आहे. त्याच बरोबर आपले हे सण cultural tourism साठी खूप मोठी संधी आहे. 

तर हा असा बालपणीचा प्रवास आता १० वी आणि १२ वी चा काळ येईपर्यंन्त बऱ्यापैकी नियमित सुरु असतो आणि मग त्यामध्ये एक ब्रेक येतो. मग जसे आपले ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन होते तेव्हा तेव्हा परत आपली गाडी मै उडना चाहता हूं ... दौडना चाहता हूं अशी सुरु होते. 





यात आपले सर्वांचे आवडते ठिकाणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि गोवा . काही दिवस पावसाळी ट्रेक आणि मित्रांबरोबर आपल्यासाठी unexplored असलेले tourist spot आपण पाहतो अनुभवतो. या मध्ये फक्त कुणी म्हणायचा अवकाश की आपण सुटतो. आणि आता तर हे instagram , आणि इतर social media वर जास्त करून इतरांना  दाखवण्यासाठी आपण जात असतो कारण ते ठिकाण अनुभवण्यापेक्षा आपले लक्ष स्वतःचे फोटो घेण्यातच जास्त असते. असो... 

आणि जसे आपण जॉब अथवा busines मध्ये पदवी मिळवल्यावर अडकून पडतो मग वरचा dialogue सुद्धा आठवत नाही याचेच तर आपल्याला या rethinking tourism मधून सिंहावलोकन करायचे आहे. जे आपण पुढील ब्लॉग मधून मुख्य विषयाकडे जाऊ . 

मला खात्री आहे कि आपल्या प्रवासाचा प्रवास जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल!







Comments

  1. पुढील ब्लॉग साठी उत्सुक आहे. फार मनोरंजक विषय आहे

    ReplyDelete
  2. पुढचा ब्लॉग वाचायला आवडेल !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day