Posts

Showing posts from November, 2022

RETHINKING TOURISM -8 | FILM TOURISM

Image
मागील ७ ब्लॉग मधून tourism विषयी विविध माहिती आपण घेतली आहे. हा सफरनामा असाच चालू ठेवताना लक्षात आले कि सध्या गोव्यात International Film Festival of India होत आहे. या फेस्टिव्हल मध्ये देश विदेशातील उत्तम चित्रपट आपल्याला पाहायला मिळतायत त्याबरोबरीने काही प्रीमियर आणि चित्रपट दिगदर्शक कलाकार यांच्या मुलाखती ऐकता येतात. रसिक प्रेक्षकांना असे फेस्टिव्हल हि एक पर्वणीच असते. आता तर बरेच शहरं देखील असे फेस्टिव्हल आयोजित करतात कधी जमल्यास नक्की एखादा दिवस अशा फेस्टिव्हल मध्ये हजेरी लावा. सिनेमा हे indirectly टुरिस्ट स्पॉट प्रमोट करतात. बघा तुम्हाला काही लोकेशन दिसतात का ते  ये कहा आ गये हम .... म्हणत म्हणत आपण अचानक ये हँसी वादिया मध्ये मणिरत्नम घेऊन जातात तिथून यूही चलाचल राही करत दिलवाले दुल्हनियाच्या सरसोंच्या पिवळ्याधमक शेतातून  बॉर्डर मधील वाळवंट आले सुद्धा .  ये मुंबई मेरी जान रिमझिम गिरे सावन आपल्याला दाखवतो. पण आपला दिल चाहता है गो गोवा गॉन करत कधी बीच वरच्या वाळूत लव्ह यू जिंदगी करत लाटांशी खेळतो.  मरुगेलारा ओ राघवा गुणगुणत हंपीच्या हेरिटेज वास्तू साद घालतात. मग त...

RETHINKING TOURISM - 7 | SPORTS TOURISM

Image
 फुटबॉल वर्ल्ड-कप सुरु झालाय ..किती जणं पाहतायत ? तुम्हाला वाटले असेल हे tourism च्या ब्लॉग मध्ये स्पोर्ट कसं काय? तर आजचा ब्लॉग  sports tourism या प्रकारच्या tourism विषयी.  दरवर्षी अथवा दोन-चार वर्षांनी होणारे स्पोर्ट्स इव्हेंट्स जसे कि टेनिस , फॉर्म्युला १ , क्रिकेट , फ़ुटबाँल , ऑलिम्पिक,बुद्धिबळ याच्या जागतिक स्पर्धा विविध देशांमध्ये नियमितपणे भरवल्या जातात. या स्पर्धांना इतिहास आहे आणि खेळा बरोबरच विविध देशांमधील संबंध मजबूत होण्यास खेळ ice breaker सारखे काम करते.  प्लेयर्स ,सपोर्टींग स्टाफ , प्रशिक्षक , आणि इतर प्रतिनिधी हे या निमित्ताने यजमान देशात येतात. स्थानिक फूड , संस्कृती , विविध पर्यटन स्थळे यांना ते फावल्या वेळेत भेटी देतात जे अप्रत्यक्षरीत्या त्या डेस्टिनेशन करिता ब्रँड अम्बॅसेडर सारखे काम करतात.    आता तर प्रेक्षक सुद्धा आपले ग्रुप घेऊन मॅच पाहण्यासाठी आणि आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी सर्व venue वर हजर असतात. आपण I P L मध्ये हे अनुभवले असेल. असेच प्रत्येक  देशाचे fans आपल्या टीम बरोबर ट्रॅव्हल करत राहतात.  अशा प्रकारचे सामने आयो...

Mind Master | Marathi Summary

Image
 सौजन्य - माईंड मास्टर - विश्वनाथन आनंद  बुद्धिबळ विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी आपला बुद्धिबळ विश्वातील प्रवास या मध्ये सविस्तर सांगितला आहे. बऱ्याच जणांना हा खेळ कदाचित आवडत नसेल पण यातील स्ट्रॅटेजि आणि प्लँनिंग आपल्याला नेहमीच्या आयुष्यात देखील कसे उपयुक्त होऊ शकते हे खूप चांगल्या रीतीने यात सांगितले आहे.  १. आपल्या खेळाची समोराच्याला सहज अंदाज येणं हे कामाच्या व्यवसायाच्या आणि स्वतः साठी फार फायद्याचे नसते. फार काळ द्विधा मनःस्थिती अथवा परिणामांचा विचार करण्यापेक्षा योजना तडीस नेण्यास प्राधान्य द्या.  २. आपण  ध्येयापासून किती दूर अथवा यश किती हुलकावणी देते अशा वेळेस प्रयत्न चालू ठेवणे हे बरे असते.  ३. आपलें छंद आणि अभ्यासाच्या विषयात विविधता हवी त्याचा कधी कसा फायदा होईल हे सांगता येत नाही कदाचित ती आपल्या नेहमीच्या कामाशी संबंधित नसेल पण वाया जाणार नाही.  ४. गोंधळलेल्या अवस्थेत निर्णय घेण्यापेक्षा एक पाऊल मागे घेऊन मन स्थिर झाल्यानंतरच पुढे जाण्याची सवय करायला हवी.  ५. आपला दृष्टिकोन एकांगी असू नये. शिकण्याच्या विविध पद्धती , इत...

RETHINKING TOURISM -6 | PILGRIMAGE TOURISM

Image
 आपण डेस्टिनेशन चे दोन प्रकार पहिले आता आपण tourism चे प्रकार बघू . आपल्या सर्वात परिचयाचा आणि नेहमीचा म्हणजे pilgrimage tourism . आपल्या आवडत्या धार्मिक स्थळांना जाऊन तेथील वातावरण अनुभवून मनःशांती मिळवण्याचा आपला हेतू असतो. साधारण पणे आपण गर्दी टाळून दर्शन होईल अशा प्रकारे प्लॅन करतो. मात्र काही काही उत्सव यात्रा अशा असतात की ज्यासाठी आपल्याला त्या गर्दीचा भाग होता आले तर नेमके कशासाठी हे चालू आहे याची अनुभूती मिळू शकते.  अशी कल्पना करा कि आपण एक थ्री डी गेम पाहत आहोत आणि त्यानुसार आता visualise करा की आपण एकदा तिथे पोहोचल्यावर कशा पद्धतीने तो सभोवताल न्याहाळतो. मग आपले चप्पल काढण्यापासून ते काही पूजेचे साहित्य खरेदी , मग रांगेत उभे राहून आपला दर्शनाचा नंबर येई पर्यंत वाट बघणे या दरम्यान आपण आपले विचार पाहायचे शांतपणे.  आणि मग ज्यासाठी एवढा अट्टहास केला त्याक्षणी म्हणजेच दर्शनाच्या वेळी आपले लक्ष विचलित न होता , दर्शनमात्रें कामनापूर्ती असा अनुभव सहज मिळेल. मग आपल्या सर्वांचा आवडता प्रसाद घेऊन आपण निघतो. या प्रसादाचे स्थानमाहात्म्य असतेच त्यामुळे घरी केलेला शिरा आणि मंद...

चहा टाळ्या

Image
 

RETHINKING TOURISM -5 | MARATHI

Image
  आपण तर रिलॅक्स होण्यासाठी फिरायला जातो आणि हे कुठे अभ्यास करायला सांगतात आपल्याला ? असे मागील पोस्ट वाचल्यावर वाटले असेल . तर असा एक्दम काही अभ्यास तर होऊ शकत नाही आणि मुळात परीक्षेसारखा अभ्यास थोडीच करायचा आहे तर निरीक्षण आणि त्यानुसार थोडेसे मनन करण्याची सवय असल्यास हे आपोआप घडेल. त्याकरिता बेस्ट पर्याय म्हणजे ; आपण आता जिथे रहात आहात ते ठिकाणं अनुभवणे. याच्यात मॉल शॉपिंग , रेस्टॉरंट, मल्टिप्लेक्स, याच्याशिवाय खूप गोष्टी घडत असतात आणि आत्ता तर याचा season सुरु होतोय. हेच त्या शहराचे culture (संस्कृती) असते.  कला,साहित्य ,प्रदर्शन ,क्रीडा ,संगीत कार्यक्रम ,कॅम्प ई. चा मौसम येतोय. या पैकी जे जे आपल्याला आवडते ते ते प्रत्यक्ष सहभागी अथवा बघायला सुरुवात करा. नेहमीच्या आयुष्यात आपण एवढे गुरफटलेले असतो कि कितीतरी चांगले व्याख्याते , चित्र प्रदर्शन होऊन जातात पण आपल्याला त्याची गंधवार्ता सुद्धा नसते. तर हे करायला सुरुवात करा म्हणजे actual destination ला गेल्यानंतर मोबाईल आणि फोटो मध्ये गुंतून न राहता , तेथील सभोवताल आपण अनुभवू शकतो कारण जाऊन आल्यावर आपल्याला कळते कि हे पण मस्त ...

Dr. M Visvesvaraya | Marathi Book Summary

Image
 सर विश्वेश्वरय्या ....लेखक - मुकुंद धाराशिवकर , साकेत प्रकाशन  भारतरत्न  सर विश्वेश्वरय्या यांच्या चरित्रावरील छोटे पुस्तक . या मध्ये सर विश्वेश्वरय्या यांची कामाची पद्धत आणि कर्तृत्व खूप चांगल्या प्रकारे लिहिले आहे. एक निष्णात अभियंते, उद्योजक, शिक्षणतज्ञ , अर्थशास्त्री , शेतीतज्ञ ,लेखक आणि देशाच्या सर्वागीण प्रगतीसाठी कार्यरत असणारे द्रष्टे व्यक्तिमत्व .  काही ठळक गोष्टी या लेखामध्ये पाहूयात  १. जे प्रत्यक्ष वापरता येते आणि जगणे सोपे करते ते ज्ञान म्हणजे शिक्षण  २. यशस्वी इंजिनिअर व्हायचे असेल तर स्थानिक लोकांमध्ये मिसळा. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे प्रश्न समजावून घ्या. मते जाणून घ्या. तरच खऱ्या अर्थाने यश मिळेल.  ३. सोडवायचा असेल तर सरळ प्रश्नाला सामोरे गेले पाहिजे. आजचा विषय उद्यावर टाकू नये.  ४. ज्या व्यक्ती प्रश्नाशी संबंधित आहेत त्यांच्याशी सरळ संवाद साधला तर प्रश्न सुटणे जाते.  ५. सर्व अडचणी कागदपत्रे आकडेवारी नियम हे स्पष्टपणे मांडावे.  ६. वेळेबाबत काटेकोर आणि संपूर्ण अभ्यास करून मगच कृती करण्याची हातोटी.  ७. शोधा , शि...

RETHINKING TOURISM- 4

Image
 चला आता तुम्ही एक तर ट्रीपला जाऊन आला असाल अथवा ट्रिप चालू असेल ...  शक्यतो आपण जे destination निवडतो ते आपल्याकडे असणारा वेळ, budget , आणि आपले dream destination याचा विचार करून नक्की करतो. हे ठिकाण natural अथवा man - made या प्रकारातील असते. आता तुम्ही एक निरीक्षण करा कि ज्यासाठी म्हणून आपण ट्रिप ला गेलो होतो तर तिथला अनुभव चांगला आणि ठीक असा लिहून काढा म्हणजे आपण ते ठिकाण किती प्रमाणात अनुभवले आहे ते कळेल. का उगीच येरझार झाली हे पहा.  एखाद्या ठिकाणी आपण गेलो कि शक्यतो तेथील architecture , engineering मास्टर पीस अशा स्थळी फोटो काढतो. हे करत असताना आजूबाजूची जैवविविधता ( Biodiversity ) हि जर अनुभवता आली तर ट्रिप खूप सार्थकी लागेल. आणि विशेषतः जर तुमच्याबरोबर मुले असतील तर यांना या सर्व निसर्गनिर्मित गोष्टींची माहिती आपण सांगू शकतो जी त्यांना अभ्यासाबरोबरच स्वतःची passion शोधायला मदत करेल. या साठी ट्रिप झाल्यावर एक रिपोर्ट तुम्ही लिहून काढा जसे आपण कॉलेज मध्ये industrial visit झाल्यावर करत असू.  तुम्हाला वाटेल याचा काय उपयोग तर मध्ये सुधा मूर्तींची मुलाखत ऐकली त्याव...