Mind Master | Marathi Summary

 सौजन्य - माईंड मास्टर - विश्वनाथन आनंद 

बुद्धिबळ विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी आपला बुद्धिबळ विश्वातील प्रवास या मध्ये सविस्तर सांगितला आहे. बऱ्याच जणांना हा खेळ कदाचित आवडत नसेल पण यातील स्ट्रॅटेजि आणि प्लँनिंग आपल्याला नेहमीच्या आयुष्यात देखील कसे उपयुक्त होऊ शकते हे खूप चांगल्या रीतीने यात सांगितले आहे. 

१. आपल्या खेळाची समोराच्याला सहज अंदाज येणं हे कामाच्या व्यवसायाच्या आणि स्वतः साठी फार फायद्याचे नसते. फार काळ द्विधा मनःस्थिती अथवा परिणामांचा विचार करण्यापेक्षा योजना तडीस नेण्यास प्राधान्य द्या. 

२. आपण  ध्येयापासून किती दूर अथवा यश किती हुलकावणी देते अशा वेळेस प्रयत्न चालू ठेवणे हे बरे असते. 

३. आपलें छंद आणि अभ्यासाच्या विषयात विविधता हवी त्याचा कधी कसा फायदा होईल हे सांगता येत नाही कदाचित ती आपल्या नेहमीच्या कामाशी संबंधित नसेल पण वाया जाणार नाही. 

४. गोंधळलेल्या अवस्थेत निर्णय घेण्यापेक्षा एक पाऊल मागे घेऊन मन स्थिर झाल्यानंतरच पुढे जाण्याची सवय करायला हवी. 

५. आपला दृष्टिकोन एकांगी असू नये. शिकण्याच्या विविध पद्धती , इतर दृष्टिकोन याचा विचार आणि वापर करा. बुद्धिबळाच्या पटावर निर्माण होऊ शकणाऱ्या आकस्मिक स्थितीचा सराव थेट मुळाला हात घालणारा असावा. आपला एक शिस्तबद्ध दिनक्रम आखा जेणेकरून तणावाच्या स्थितीत शांत राहून यश मिळवण्यास उपयुक्त होईल. 

६. प्रतिस्पर्ध्याला माझ्या खेळाचा अंदाज आला तरी खेळ मध्ये चटकन बदल करून मानसिक दडपण झुगारून देता न आल्याने हार पहावी लागली. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे केवळ सक्षम व तरबेज खेळाडू या गोष्टीने विजेता होऊ शकत नाही तर त्या साठी विश्वविजेता होण्याची आस मनाला लागली पाहिजे तरच प्रयत्नाचे मोल सिद्ध होणार. 

७.  यशस्वी होण्यासाठी परिस्थितीनुरूप स्वतः बदलता आले पाहिजे, कारण आपल्या भोवतालचे वास्तव सतत बदलत असते.  बदलाला स्वीकारणे ,मनातील पूर्वग्रह काढून टाकणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे या गोष्टी कोणत्याही स्थिती नीट हाताळण्यास उपयुक्त आहेत.

८. स्पर्धेच्या दरम्यान मोठी आघाडी मिळवणे आणि प्रत्यक्ष स्पर्धा जिंकणे यात खूप फरक असतो. अशावेळी मनाचा तोल सांभाळून वास्तवाचे भान असणे गरजेचे. आधीपासूनच जर विजय रंगवू लागलात तर तो तुमच्या हातून निसटून जातो. 

९. कठीण स्थितीत आपल्यापाशी असलेले मार्ग आणि क्षमता यांचा शांत पणे शोध घेऊन मार्ग काढू शकतो मात्र या साठी स्वतः वर विश्वास असणे गरजेचे. 

१०. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे विशेषतः यश मिळाल्यावर .आपल्यातील उणीव भरून काढण्याचा सतत प्रयत्न असला पाहिजे. सराव आणि दृष्टिकोन यात निष्क्रियता न येण्याची काळजी घेण्याची सवय तुम्हाला अशी संधी मिळते जी तुमच्या पडत्या काळात तुम्हाला वर उचलते. 

११. आयुष्याप्रमाणे बुद्धिबळातही सतत शिकत राहणे महत्वाचे आहेत. हे करताना वाईट सवयी , खेळण्याची पद्धत अथवा शैली यशस्वी होत नसेल तर सोडून देण्याची तयारी पाहिजे. अपयशाच्या मालिकेतून बाहेर पडण्यासाठी दोषांचे मूळ शोधणे; यश मिळवण्यासाठी  गरजेचे आहे. 

 

Comments

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day