RETHINKING TOURISM -8 | FILM TOURISM




मागील ७ब्लॉग मधून tourism विषयी विविध माहिती आपण घेतली आहे. हा सफरनामा असाच चालू ठेवताना लक्षात आले कि सध्या गोव्यात International Film Festival of India होत आहे. या फेस्टिव्हल मध्ये देश विदेशातील उत्तम चित्रपट आपल्याला पाहायला मिळतायत त्याबरोबरीने काही प्रीमियर आणि चित्रपट दिगदर्शक कलाकार यांच्या मुलाखती ऐकता येतात. रसिक प्रेक्षकांना असे फेस्टिव्हल हि एक पर्वणीच असते. आता तर बरेच शहरं देखील असे फेस्टिव्हल आयोजित करतात कधी जमल्यास नक्की एखादा दिवस अशा फेस्टिव्हल मध्ये हजेरी लावा. सिनेमा हे indirectly टुरिस्ट स्पॉट प्रमोट करतात. बघा तुम्हाला काही लोकेशन दिसतात का ते 

ये कहा आ गये हम .... म्हणत म्हणत आपण अचानक ये हँसी वादिया मध्ये मणिरत्नम घेऊन जातात तिथून यूही चलाचल राही करत दिलवाले दुल्हनियाच्या सरसोंच्या पिवळ्याधमक शेतातून  बॉर्डर मधील वाळवंट आले सुद्धा .  ये मुंबई मेरी जान रिमझिम गिरे सावन आपल्याला दाखवतो. पण आपला दिल चाहता है गो गोवा गॉन करत कधी बीच वरच्या वाळूत लव्ह यू जिंदगी करत लाटांशी खेळतो.  मरुगेलारा ओ राघवा गुणगुणत हंपीच्या हेरिटेज वास्तू साद घालतात. मग तू हि रे करत बॅक वॉटर चा निवांत आनंद घेत नारळ पाणी पितो. आणि बाहुबली तला धबधबा चा प्रपात अंगावर घेत ऊटी सारख्या निसर्गरम्य ठिकाणी दिल से हरखून जाताना पुष्पा आपल्याला शेषाचलमच्या घनदाट जंगलात वाट शोधत शोधत भेडाघाटातून अशोकाच्या राज्यात येतो. 

एवढे फिरून दमल्यावर बंटी आणि बबली पेठा खाऊन खाऊकी पान बनारसवाला करत गुपचूप हावडा ब्रिज कडे ओ मांझी रे गात गंगाजल पिऊन जय जगन्नाथ करून  रॉक ऑन करत ट्रिपचा एन्ड ३ इडियट सारखा तलावाच्या काठी झाल्यास मज्जा येईल ना . 

आता सहज पहा आपल्या डोळ्यासमोरून आपण कुठे कुठे जाऊन आलो. त्याचमुळे फिल्म टुरिजम ला खूप महत्व येत आहे. आपली इच्छा असते कि शूटिंग झालेल्या ठिकाणी फोटोशूट करावे आणि प्रवास संस्मरणीय करावा . परदेशात हे खूप आधीपासून प्रयत्न केल्याने बर्फाचे डर वाटत असेल तर बुर्ज खलिफाशी सहज दोस्ती करत टोमॅटो फेस्टिव्हल चा आनंद घेत जिंदगी ना मिलेगी दोबारा चा फील येतो. 

हि सिनेमाची ताकद आहे आणि वेगवेगळे लोकेशन पाहिले कि इतक्यात दमू नका पिक्चर अभि बाकी है म्हणत पुढच्या हैप्पी जर्नी ची तयारी करतो. 

तुम्हाला या ब्लॉग मध्ये सापडलेले लोकेशन नक्की कॉमेंट मध्ये सांगा . 




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day