GUIDE TO PLAN MENU IN MARATHI | अशा प्रकारे मेनू तयार करा


कार्यक्रमांचे नियोजन कसे करायचे हे आपण पाहिले त्याच्या बरोबरीने हमखास  विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मेनू काय आहे ?

एक तर सर्व मेनूच्या सर्व कोर्सेस मध्ये खूप पदार्थ असतात त्यातून निवड करायची म्हणजे विचारपूर्वकच ते करावे लागते त्यासाठी सोप्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात 

  1. आपली आवडी / निवडी - बऱ्याचदा असे होते की अमुक एखादा पदार्थ आपल्याला आवडत नाही विशेषतः पनीर, मश्रूम , मासे इ  तर शक्यतो याचे प्रमाण कमी ठेवा म्हणजे आलेल्या व्यक्ती सहज ते खाऊ शकतील नाहीतर तुम्हाला ऐनवेळेस एखादा पर्याय द्यावा लागेल. 
  2. साहित्याची उपलब्धता - जे काही पदार्थ आपण निवडू ते बनवण्यासाठी लागणारे  सर्व पदार्थ,मसाले ( raw material )हे बाजारात उपलब्ध असतील हे पहा. या साठी seasonal ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांचा समावेश करा जेणेकरून विविधता असेल आणि खर्च पण कमी होईल. 
  3. उपकरणं / मनुष्यबळ - जसे साहित्याची मुबलकता महत्वाचे तसेच सगळे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी उपकरणं / भांडी हि सुद्धा आवश्यक आहेत. त्यामुळे पदार्थ तयार करणे सोपे होऊन योग्य पद्धतीने ते बनवले जाऊ शकतात. हे सर्व कसे वापरायचे हे जाणणारे कुशल मनुष्यबळ आहे का ते बघा नाहीतर नियोजन उत्तम पण जो करणारे त्यालाच येत नसेल तर या सगळ्याचा काही उपयोग नाही. 
  4. पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचा आपल्या मेनू मध्ये शक्यतो पुनरावृत्ती टाळा उदा टोमॅटो, बटाटे , चिकन हे शक्यतो एकदाच असतील ( सूप/ मेन कोर्स ). कारण होते काय हे मुख्य साहित्य परत परत इतर पदार्थांमध्ये असली कि ते खाण्यास उत्सुकता कमी होते. 
  5. मेनू मध्ये जेवढे पदार्थ बनवणार आहात त्याची पद्धत वेगवेगळी असू द्यात जसे कि भाजणे , तळणे,उकडणे, परतणे, बेकिंग, अशा पद्धतींचा समावेश करा जेणेकरून तयार होणाऱ्या पदार्थांचे texture मध्ये विविधता येईल. 
  6. जसे साहित्याची पुनरावृत्ती टाळायची त्याप्रमाणेच रंगसंगती सुद्धा नीट पाहायची. अशी कल्पना करा कि सगळे पदार्थ एकत्र तुम्ही पाहत आहात जर ते एकाच रंगात दिसले तर उपयोग नाही त्यामुळे रंगामध्ये वैविध्य राहील ते पहा. 
  7. एवढा सगळा घाट घातल्यावर हे सारे पदार्थ त्याला साजेश्या प्लेट ,बाउल , डिस्पोझेबल नुसार स्पून , फोर्क सहित  व्यवस्थित दिले म्हणजे झाले. 

अशा तऱ्हेने आपला मेनू तयार करा करा आणि संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन करा. 

Comments

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day