महाशिवरात्री | Mahashivratri
आज महाशिवरात्री ....
नक्कीच फराळ काय काय करायचा या उपवासादिवशी याचे नियोजन केले असेलच पण त्या बरोबर या दिवसाचा उपयोग आपण आध्यात्मिक उन्नती करिता याचे जास्त महत्व आहे.
शिव शंकराचे मंदिरे जर आपण पाहिली असतील तर अतिशय गूढ निसर्गरम्य ठिकाणी उंच डोंगर अथवा अरण्य अशा नैसर्गिक शांत ठिकाणी असतात जेणेकरून येणारा भाविक मनाला शांतता लाभून आनंदाची , समाधानाची अनुभूती घेऊ शकतो. भारतातील ज्योतिर्लिंगच नाही तर इतरही स्थानिक ठिकाणी ही मंदिरे नदी, तलाव अशा जलाशयाकाठी आढळतील. इतर देवी-देवतांच्या मंदिरात दिसणारा झगमगाट त्यामानाने आपणास दिसत नाही कारण महादेव हे विरक्त आहेत.
नेहमी फोटो मध्ये दिसणारी महादेवाची पोज म्हणजे सदैव ध्यानस्थ !
हे कशाचे एवढे ध्यान करतात ते देवी पार्वतीने एकदा विचारले आणि ज्या दिवशी याची माहिती दिली तो हा महाशिवरात्रीचा दिवस. शिवतत्व या दिवशी जास्त प्रमाणात प्रसारित होत असते ज्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण आपल्या साधनेकरिता केला पाहिजे.
सध्या विदेशामध्ये ध्यान हा तेथील अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. ध्यानाचा काय फायदा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून आता मोठ्या कंपन्यात सुद्धा कामाचा ताण कमी करून उत्साह राहावा याची काळजी घेत आहेत.

Comments
Post a Comment