साहसी पर्यटन | WATER SPORTS ADVENTURE TOURISM

 मागील भागात आपण ट्रेकिंग विषयी माहिती घेतली 

आज वॉटर ऍडव्हेंचर स्पोर्ट्स विषयी माहिती घेऊ.तलाव , नदी, बॅक वॉटर , समुद्र, अशा जलाशयांमध्ये हे केले जातात.  आपल्या महाराष्ट्रात मालवण -तारकर्ली येथे याच्या चांगल्या सोयी आहेत. 

१. स्कुबा डायविंग - समुद्राच्या खोल पाण्यात डुबकी मारून तेथील मासे , वनस्पती , प्रवाळ अशी अद्भुत दुनिया आपल्याला पाहायला मिळते. यांच्यात आपल्याला श्वसनासाठी लागणारे साहित्य कॅरी करून पाण्यात बुडी मारता येते. आपण जरी या पूर्वी डाइव्ह केले नसेल तरी बेसिक डायविंग आपण करू शकतो. प्रोफेशनल डायव्हर्स साठी कोर्सेस असतात जे खूप खोलीवरती समुद्रात जातात. सध्या गडद अंधार नावाचा सिनेमा याच थीम वर आधारित आहे. 

२. रिव्हर राफ्टिंग - नदीच्या खळाळत्या प्रवाहात आपली राफ्ट कुशलतेने चालवणे हे या प्रकारात येते. नदीचा जोरदार प्रवाहात राफ्टचा तोल सांभाळणे या साठी शारीरिक , मानसिक कौशल्याचा कास लागतो.  

यांच्यात थोडा फरक असणारा प्रकार म्हणजे कयाकिंग ! इथे १ किंवा जास्तीत जास्त दोघे बोट वल्हवत नेतात.त्या बरोबरच बोटींचा प्रकार सुद्धा वेगळा असतो. कयाकिंग चे थोडे वेगळे स्वरूप आपल्याला केरळमधील ओणमच्या वेळी होणाऱ्या बोटींच्या स्पर्धेत पाहायला मिळते. सुरुवात आपण थोड्याशा वाहत्या नदीच्या प्रवाहापासून ते पुढे जोरदार प्रवाह असा करता येईल. कुंडलिका नदी , ऋषिकेश ही काही उत्तम स्थळे या करिता आहेत. 


३. पॅरासेलिंग  - हा सिनेमा मध्ये आपण पाहिला असेल आणि इतक्यात एका आजीचा व्हीडिओ खूप व्हायरल झाला होता. यांच्यात पॅराशूट प्रकारच्या बलून मध्ये आपण असतो जो एका बोटीला बांधलेला असतो आणि जशी बोट चालू होते त्यानुसार आपण मस्त हवेत उंच उडत जातो 





Comments

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day