दिसामाजी काहीतरी लिहीत जावे असे आपण वाचलेले असते पण काय लिहायचे ? आणि कुठे लिहायचे असे प्रश्न असतात . डिजिटल मार्केटिंग करत असताना ब्लॉग बद्दल कळाले म्हणून पहिला विषय मी आणि ब्लॉग असाच घेतला. खरं तर आता आपण काही खरडत नाही पेन घेऊन मग निदान कीबोर्ड वापरून तरी लिहू म्हणजे आपले विचार स्पष्ट मांडता येतात का ? हे आपल्याला कळून येईल . रोजचे वाचन , एवढ्या दिवसातील विविध क्षेत्रातील अनुभव आपण घरातल्यान , मित्रांना सांगतो पण घर कि मुर्गी दाल बराबर सारखे प्रकार त्यापेक्षा असे लिहिलेले बरे . येणाऱ्या काळात हे लिखाण आपणास आवडेल अशी आशा आहे .