मराठी भाषा गौरव दिन विशेष | treasuretale.blogspot.com
मराठी भाषा गौरव दिन म्हणजे रे काय भाऊ ? .... पु.ल. देशपांडे यांचे म्हणजे रे काय भाऊ ! असे वाऱ्यावरची वरात मधील हा संवाद ऐकू येईल की काय असे होण्याआधीच मराठी बद्दल आस्था असणाऱ्यांना माहिती असावी या साठीच हा ब्लॉग . ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्रेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा . शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर आपल्या मायबोलीचा जागर आपण करायचा नाही तर एवढी अमृतातें पैजा जिंकणारी अशी ज्ञानेश्वरांनी ग्वाही दिलेल्या भाषेची पालखी आपणच उचलली पाहिजे. नुकताच एका वाचनालयात घडलेला प्रसंग , एक शाळकरी मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला हा वाचनालयाचा फॉर्म भरून द्या म्हणून .. मला आश्चर्य वाटले की शाळेतील मुलगा का विचारतोय तर तो म्हणाला मला मराठी लिहिता येत नाही , इंग्लिश मेडीयम शाळा आहे माझी. ऐकूनच सर्द झालो जर लिहिताच येणार नसेल तर तो शब्द वाचायचा कसा हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला. शक्यतो आपले असे म्हणणे असते की एवढे काय भाषेचे काम झाले संपले पण याच बाबत विदेशात अथवा आपल्...