या भारतीय गीताने पटकवला ऑस्कर | treasuretale.blogspot.com
.jpg)
नाटु नाटु ने घडवला इतिहास सर्वांच्या ओठावर असणारे आणि पाय थिरकवण्यास बाध्य करणारे RRR या चित्रपटातील नाटु नाटु या गाण्याने ओरिजिनल सॉंग या विभागात मानाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. एम एम किरवाणी यांनी हे चंद्रबोस यांच्या या अफलातून शब्दांना संगीतबद्ध केले आहे तर राहुल सिप्लिनगुंज आणि भैरव यांनी ते गायले आहे. मूळ तेलुगु भाषेत असणाऱ्या या गीताने अक्षरशः तमाम दुनियेला वेड लावले आहे आणि अनेक देशात ज्यु. NTR आणि रामचरण यांच्या तुफान ऊर्जेच्या नृत्याची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न रील्स च्या द्वारे सामान्यांपासून अगदी इतक्यात उच्च पदस्थ सरकारी अधिकारी देखील याच्या तालावर नाचताना दिसले. बाहुबली फेम एस एस राजमौली यांनी दिग्दर्शित चित्रपटाने केवळ तिकीटबारीवर इतिहास घडवण्यासोबत आता ऑस्कर मिळवून हे सिद्ध केले आहे की संगीत हे एखाद्या देशा पुरते मर्यादित नसते तर ते इतर भाषिक लोकांना देखील आवडू शकते. मध्ये नाही का गंगम स्टाईल हे गाणे असेच लोकप्रिय झालेले. शब्द ,संगीत ,गायन या कला नेहमीच लोकांचा आवडीचा विषय राहिला आहे आणि जेव्हा याच्या जोडीला नृत्य हि सामील होते तेव्हा ऐकणाऱ्यास आपल्या त्या क