Posts

तिळगुळ घ्या गोड बोला | HAPPY MAKAR SANKRANTI

Image
 अ - इकडे ये हे घे ...   तिळगुळ घ्या गोड बोला ! ब  - काय एवढ्यासाठी बोलवतो , मी नेहमी गोडच बोलतो .खरी गरज तर क ला आहे त्याला दे  क - गोड बोलायचं तर त्यात काय विशेष आणि हे तिळगुळ कशाला ? अ - तू कधी कॉर्पोरेट ट्रेनिंग किंवा सॉफ्ट स्किल सेशन अटेंड केले आहे का ? दोघेही हो केले कि . अ - मग हे तेच तर आहे Ice Braker , बोलायला सुरुवात करण्यासाठीचे एक निमित्त  ब - काही पण  अ - हे बघ जेव्हा बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो तेव्हा असेच काही तरी विषय सुरु करण्यासाठी बोलत असतो आणि गोड पदार्थ सर्वांनाच आवडतो म्हणून हा सण , थोडीच चॉकलेट दिली पाहिजेतएक तीळ सात जणांनी वाटून घेतो आपण आता तर सगळा लाडू देतोय ..  क - उगी काही तरी ढील नको देऊ ,  ब - अरे हे तर ट्रेनिंग चे खरे आहे असेच गेम्स शिकवतात .  जेणेकरून अनोळखी लोकांशी आपण मोकळे पणाने बोलू शकू . आणि सेल्स आणि मार्केटिंग मध्ये तर हटकून गोड म्हणजे चांगले बोलावेच लागते.  अ - बघ ! मग हळू हळू माणूस बोलता होता.  आणि तिळगुळ या थंडीच्या वातावरणात आपल्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता देण्याचं काम करतात.  ब - एका दिवसांनी असे काय होणारे  अ - अरे मग रोज गोड बोलायला काय ह

मेनू बद्दल माहित नसलेल्या गोष्टी | INTERESTING FACTS ABOUT MENU

Image
आज जो आपण मेनू पाहतो याची एक सोपी व्याख्या आहे ती म्हणजे पदार्थांची यादी ! याची सुरुवात ब्रिटन च्या राजाने केली. तिथे जेवणासाठी खूप सारे पदार्थांची रेलचेल असे आणि सर्व पदार्थ माहित असणे अशक्य व्हायचे तर त्यांनी एक युक्ती केली , जेवढे पदार्थ आहेत त्याची एक यादी बनवून त्यानुसार ठरवायचे की कोणते पदार्थ घ्यायचे जेणेकरून आवडीचे पदार्थ खाण्याकरिता नियोजन करणे सोपे जाईल. यात सुधारणा होत होत आजचा सर्व ठिकाणी दिसणारा मेनू तयार झाला.  हॉटेल इंडस्ट्री मध्ये प्रचलित असणारा मेनू हा आधी १७ कोर्स असणाऱ्या फ्रेंच क्लासिकल सिक्वेन्स म्हणून ओळखला जातो ज्यात प्रत्येक कोर्स मध्ये  विविध प्रकारच्या पदार्थांचा पर्याय असतो त्यामुळे एकूण पदार्थ ३४पेक्षा जास्त आणि त्यासोबत येणारे पदार्थ तर वेगळेच अशी भरगच्च मेजवानी असते त्याकरिता आपली भूक राखून ठेवणे क्रमप्राप्त आहे.एवढे सगळे खाणे आणि त्यासोबत wine अथवा इतर ड्रिंक्स चा आस्वाद घ्यायचा म्हणले तर किमान २-३तास पाहिजेत.  उत्तरोत्तर एवढा वेळ आता कोणापाशी नाही त्यामुळे यातील बरेचसे कोर्सेस एकत्रित करून सुटसुटीत पर्याय तयार झाले आहेत आठवून पहा रेस्टॉरंट मध्ये गेल्यानं

TREKKING | ADVENTURE TOURISM IN MARATHI | RETHINKING TOURISM -11

Image
 आपण प्रवासाचे नियोजन कसे करायचे ते पाहिले आहेच आता एक असा प्रकार पाहू जो पाहिला कि थरारक अनुभव आपणांस जाणवतो पण यातील ऍक्टिव्हिटी  करताना कदाचित भीती सुद्धा वाटू शकते. साहसी पर्यटन हा एक असाच वेगळा प्रकार आहे जे खूप थोडे पर्यटक याच्या वाट्याला जातात.  लहानपणी आपण खूप साहसी असतो पण जसजसे मोठे होते तसे एखाद्या गोष्टीतील धोके लक्षात येऊ लागल्यावर आपला उत्साह मावळत जातो. पण थोडी व्यायामाची सवय आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हा प्रकार खूप विविध प्रकारचे अनुभव आपल्याला मिळवून देतो आणि नवीन साहस करण्यास प्रेरीतही करू शकतो.  तसे पहिले गेल्यास या साहसी पर्यटनाचे आकाश,पाणी आणि जमिनीवरचे अशा उप-प्रकारात वर्गीकरण करता येईल. सुरुवातीला  आपण जमिनीशी निगडीत प्रकार पाहू  ट्रेक - हा सर्वांना हवा हवासा आणि IN प्रकार म्हणता येईल असा आहे. यात आपण चालत ठरलेल्या\ठिकाणी पोहोचतो ज्यात आपले सामान पाठीवरच्या बॅगेत आपल्याला न्यावे लागते. काही ट्रेक सोपे , मध्यम आणि अवघड अशा प्रकारात येतात. या मध्ये आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो त्यामुळे नियमित ज्यांचे चालणे आहे ते हे करू शकतील. तसेच हा प्रक

NEW YEAR |नेमेची येतो

Image
सालाबादप्रमाणे यंदाही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे आणि जुने कॅलेंडर मध्ये झालेला संवाद  न. कॅ. - जुने जाऊद्या मरणालागुनी ....  जु  कॅ -  बरं बाबा ये माझ्या जागी  न. कॅ - अब वक्त भी हमारा है , भिंत भी हमारी , खिळा भी हमारा  जु  कॅ - एवढ्या काही फुशारक्या मारू नको, एक वर्षपूर्वी मीही असाच शेफारून गेलो होतो .  तुझे असं होऊ देऊ नको  न. कॅ-  हा हे मात्र खरे आहे  जु  कॅ- आता कसं  ! आपली फक्त जागा बदलते , पंत गेले राव आले त्यासारखे  न. कॅ - असं कसं ? नवीन वर्ष म्हणजे किती तरी नवीन संधी म्हणून तर एवढ्या जोरात स्वागत करतात की आपले  जु  कॅ- हा पण आपण फक्त तारखा दाखवतो त्यासंस्मरणीय करणे थोडेच आपल्या हातात आहे  न. कॅ - छ्या मला नाही पटत . आता ज्याने मला इथे आणले त्याने बघ किती नव वर्षाचे संकल्प केलेत ते  जु  कॅ- हा हा हा दिखावे पे मत जाओ  न. कॅ- म्हणजे ! जु  कॅ- याच्यातले बरेच माझ्या वेळचेच आहेत हे बघ माझ्यावर लिहून ठेवलेल्या नोंदी  न. कॅ - हा खरंय रे  जु  कॅ - म्हणून तर म्हणालो आपण फक्त तारखा दाखवतो. हेच लोकं सुविचार सांगतात किती जगलात त्यापेक्षा कसे जगलात हे महत्वाचे आणि काय काय बच्चन मारता

GUIDE TO PLAN MENU IN MARATHI | अशा प्रकारे मेनू तयार करा

Image
कार्यक्रमांचे नियोजन कसे करायचे हे आपण पाहिले त्याच्या बरोबरीने हमखास  विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मेनू काय आहे ? एक तर सर्व मेनूच्या सर्व कोर्सेस मध्ये खूप पदार्थ असतात त्यातून निवड करायची म्हणजे विचारपूर्वकच ते करावे लागते त्यासाठी सोप्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात  आपली आवडी / निवडी - बऱ्याचदा असे होते की अमुक एखादा पदार्थ आपल्याला आवडत नाही विशेषतः पनीर, मश्रूम , मासे इ  तर शक्यतो याचे प्रमाण कमी ठेवा म्हणजे आलेल्या व्यक्ती सहज ते खाऊ शकतील नाहीतर तुम्हाला ऐनवेळेस एखादा पर्याय द्यावा लागेल.  साहित्याची उपलब्धता - जे काही पदार्थ आपण निवडू ते बनवण्यासाठी लागणारे  सर्व पदार्थ,मसाले ( raw material )हे बाजारात उपलब्ध असतील हे पहा. या साठी seasonal ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांचा समावेश करा जेणेकरून विविधता असेल आणि खर्च पण कमी होईल.  उपकरणं / मनुष्यबळ - जसे साहित्याची मुबलकता महत्वाचे तसेच सगळे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी उपकरणं / भांडी हि सुद्धा आवश्यक आहेत. त्यामुळे पदार्थ तयार करणे सोपे होऊन योग्य पद्धतीने ते बनवले जाऊ शकतात. हे सर्व कसे वापरायचे हे जाणणारे कुशल मनुष्यबळ

चहा टाळ्या

Image
 

PLAN YOR EVENT LIKE PRO | IN MARATHI

Image
 मागील  ब्लॉगमध्ये भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल ची माहिती पाहिली.  इथे खूप सारे मेनूचे पर्याय आपल्याला मिळतात  तर असेच विविध पर्याय तयार करताना कोणते मुद्दे हॉटेल्स पाहतात ते बघू जे आपण आपल्या कार्यक्रमांकरिता सुद्धा वापरू शकतो.  १. कार्यक्रमाचे स्वरूप - कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आहे म्हणजे फॉर्मल किंवा इन्फॉर्मल हे बघावे. इन्फॉर्मल मध्ये आपले फ्रेण्ड्स - फॅमिली सोबतचे कार्यक्रम उदा. लग्न, रिसेप्टशन , वाढदिवस ज्या मध्ये विशिष्ट नियम पाहुण्यांकरता नसतात याचा समावेश होतो तर फॉर्मल मध्ये ऑफिस , मीटिंग या ठिकाणचे व्यवसाय संबंधित कार्यक्रम असतात ज्यात ड्रेस कोड आणि विशिष्ट प्रोटोकोल पाळावे लागतात.  २. कार्यक्रमाची वेळ - किती वाजता कार्यक्रम आयोजित केला आहे ते पाहावे . उदा. ब्रेकफास्ट ,ब्रंच , लंच , इव्हनिंग टी , डिनर त्यानुसार आपण कोणत्या डिशेस मेनू मध्ये समाविष्ट करायच्या ते निवडण्यास मदत होईल.  ३. सीझन - वरील दोन्ही मुद्यांना जोडून उन्हाळा,पावसाळा, हिवाळा अथवा आताच्या नुसार कॉम्बिनेशन असेल तर त्यानुसार पदार्थ निवडले तर असे पदार्थ कार्यक्रमाची लज्जत जास्त वाढवतील. आता तुमच्या जिभेवर