GUIDE TO PLAN MENU IN MARATHI | अशा प्रकारे मेनू तयार करा

कार्यक्रमांचे नियोजन कसे करायचे हे आपण पाहिले त्याच्या बरोबरीने हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मेनू काय आहे ? एक तर सर्व मेनूच्या सर्व कोर्सेस मध्ये खूप पदार्थ असतात त्यातून निवड करायची म्हणजे विचारपूर्वकच ते करावे लागते त्यासाठी सोप्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात आपली आवडी / निवडी - बऱ्याचदा असे होते की अमुक एखादा पदार्थ आपल्याला आवडत नाही विशेषतः पनीर, मश्रूम , मासे इ तर शक्यतो याचे प्रमाण कमी ठेवा म्हणजे आलेल्या व्यक्ती सहज ते खाऊ शकतील नाहीतर तुम्हाला ऐनवेळेस एखादा पर्याय द्यावा लागेल. साहित्याची उपलब्धता - जे काही पदार्थ आपण निवडू ते बनवण्यासाठी लागणारे सर्व पदार्थ,मसाले ( raw material )हे बाजारात उपलब्ध असतील हे पहा. या साठी seasonal ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांचा समावेश करा जेणेकरून विविधता असेल आणि खर्च पण कमी होईल. उपकरणं / मनुष्यबळ - जसे साहित्याची मुबलकता महत्वाचे तसेच सगळे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी उपकरणं / भांडी हि सुद्धा आवश्यक आहेत. त्यामुळे पदार्थ तयार करणे सोपे होऊन योग्य पद्धतीने ते बनवले जाऊ शकतात. हे सर्व कसे वापरायचे हे जाणणारे कुशल मनुष्यबळ